छत्रपती संभाजीनगर : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ईट येथील मुकादम व वाशी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याची ८ लाख ७५ हजार रुपये फोन-पे-वरून घेत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाशी पोलीस ठाण्यात संतोष आसाराम राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून याप्रकरणी पांडुरंग मोहन चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. भैरवनाथ साखर कारखाना हा धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संबंधित मानला जातो.

हेही वाचा – फडणवीस-प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर; राजकीय टिप्पणी मात्र टाळली

हेही वाचा – राज्यात सव्वा लाखाहून अधिक ‘लखपती दीदी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईट येथील रहिवासी पांडुरंग चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे की, घनसावंगी तालुक्यातील घुन्सी तांड्यावरील संतोष राठोड याने ६ जून २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऊसतोड मजूर कारखान्याला पुरवण्याच्या नावाखाली ८ लाख ७५ हजार रुपये घेतले. १ नोव्हेंबर २०२३ सालातील गळीत हंगामासाठी मजूर पुरवण्याविषयी व्यवहारातून ठरले होते. मात्र, मजूर न पुरवून तक्रारदार व भैरवनाथ साखर कारखान्याची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.