छत्रपती संभाजीनगर: परीक्षा बंदोबस्ताला दुचाकी वर जात असतांना दोन ग्रेड पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. यामध्ये जखमी दोघांपैकी एका उपनिरीक्षचाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सकाळी नेकनूर परिसरात हा अपघात घडला. मच्छिंद्र श्रीधर ननवरे असे मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे.

सिरसाळा पोलीस ठाण्यातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे व दिंद्रुड पोलीस ठाण्यातील मच्छिंद्र श्रीधर ननवरे हे दोघे परीक्षा बंदोबस्ताला दुचाकीवरून जात होते. नेकनूर परिसरामध्ये त्यांच्या दुचाकीला (एम एच २३, एके – ९३९७) भरधाव स्विफ्ट कारने (एम एच०-२३, बीसी – २१०८) समोरून धडक जोराची धडक दिली.

हेही वाचा : तीर्थाटनाला गेलेल्या मालकाकडील ७९ तोळे पळवणारा कामगारच सूत्रधार; सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधे मच्छिंद्र ननवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मृत ननवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान धडक देणारा स्विफ्ट कार चालक पसार झाला असून त्याचा शोध, नेकनुर पोलीस करत आहेत यासाठी एक पथक रवाना झालेलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.