सुहास सरदेशमुख

बसने प्रवास करून छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचे स्वागतच एका मोठ्ठया खड्डय़ाने होते. मग अंतर्गत रस्त्यावरून जावयाचे असेल तर ऑटो रिक्षा आदळत आपटत पोहचवते. पण अलीकडे जी-२० परिषदेनिमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते अधिक चांगले करण्यात आले. विमानतळासमोरील रस्ता आता चांगला झाला आहे. शहरातील बहुतांश रस्ते सिमेंटचे व्हावे यासाठी गेली पाच वर्षे महापालिकेस निधी मिळत गेला. त्यामुळे प्रमुख रस्त्याचे रडगाणे तसे कमी झाले आहे. पण अंतर्गत रस्त्याचे प्रश्न अजून कायम आहेत.

Solapur, Man Returning from Wedding Beaten, Man Beaten to Death, Solapur Railway Station, crime in Solapur, murder in Solapur, marathi news, Solapur news, Solapur police,
सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी पादचाऱ्याचा खून
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले

नव्याने होणाऱ्या रस्त्याची काही कामे निकृष्ट दर्जाची झाली. त्यामुळे ते नव्याने करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पाऊस बरसत असला तरी तो मराठवाडय़ात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फारसा नाही. त्यामुळे नवीन खड्डे तयार झाले नाहीत. पण नवीन रस्ते तयार करताना आणि गट्टू बसविण्यासाठी रडतरखडत सुरू असणाऱ्या कामांमुळे दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागते. खड्डय़ांची ओरड व महापालिका निवडणुका लागल्याच तर आपले वर्चस्व राहावे म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी शहरातील रस्त्यांसाठी सुमारे २५० कोटींचा निधी दिला होता. त्यामुळे या समस्येची तीव्रता तुलनेने कमी आहे.