तीन अपत्ये असल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनर औरगांबादच्या गुलमंडी परिसरात लावण्यात आले आहेत. हे बॅनर रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने लावले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे.

“औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक २०२२. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. यासाठी जातीची कोणतीही अट नाही. वय वर्ष २५ ते ४० अविवाहीत, विधवा, घटस्फोटित चालेल. फक्त २ पेक्षा जास्त अपत्ये असणारी चालणार नाही,” असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. या बॅनरवर त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक देखील टाकला आहे.

Sandeep Sankpal came on bicycle and submitted his candidature to Kolhapur to protect the environment
कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
शरद पवारांच्या आगमनापूर्वीच वर्धेत मानापमान नाट्य; काँग्रेस नेत्यांना व्यासपीठावर स्थान नाही
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता

“माझी राजकारण यायची इच्छा होती. परंतु मला तीन अपत्ये असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. मी फार जुना कार्यकर्ता आहे, त्यामुळे नगरसेवक पदाची निवडणूक तरी लढवावी असं मला वाटलं. आता मी तर निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी विचार केला की लग्न करायचं, बायकोला निवडणुकीत उभं करायचं आणि निवडून आणायचं,” अशी प्रतिक्रिया या बॅनर लावलेल्या रमेश पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.