छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथे साेमवारी दुपारी मोठा आवाज होऊन आकाशातून दोन ते तीन उल्कापिंड पडल्याचे आढळून आले. साधारणपणे ८० सेंटीमीटर आकारापर्यंतचे हे पिंड असून, प्रकारानंतर वडवणीचे तहसीलदार वैभव महेंद्रकर, तलाठी एस. टी. यशवंत यांच्या पथकाने पंचनामा केला. काही खगाेलीय अभ्यासकांनी निमगावाला भेट देऊन उल्कापिंडांची पाहणी केली.

यातील अभ्यासकांच्या चमूमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील डाॅ. एपीजे अब्दुल कलाम अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, अभिनव विटेकर हेही होते. औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित उल्कापिंडांचा आकार, घनता, वस्तुमान पाहता उल्कापिंडच असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आढळून आलेले तुकडे हे प्रयोगशाळेत पाठवून त्याबाबतची माहिती घेतली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी दुपारी खळवट निमगाव येथील भिकाजी ज्ञानोबा अंबुरे यांच्या घराच्या पत्र्याच्या खोलीवरही एक तुकडा पडला. त्यामुळे पत्र्याला छिद्र पाडून तो तुकडा जमिनीवर पडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली.