भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी येण्यापासून रोखलं होतं. उत्तर भारतीयांची माफी मांगा मगच अयोध्येत पाय ठेऊन देऊ, अशी आक्रमक भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती. अशात त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “ब्रिजभूषण सिंह हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. ज्या महिला कुस्तीपटूंनी आरोप केल्यात त्यात साक्षी मलिक ही सुद्धा आहे. देशाचं नाव त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवलं आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला वेठीस धरलं आहे,” असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

आणखी वाचा – “…तर फाशी घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर ब्रिजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण; बदनामीच्या मागे उद्योगपती असल्याचा दावा

“ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येला जाण्यापासून रोखलं. षडयंत्र रचण्यात आलं. पंतप्रधान मोदी आणि भाजपाचं ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांवर काय मत आहे. अशा वृत्ती भाजपात असतील तर, २०२४ च्या निवडणुकीत कसं होईल. तसेच, भाजपा महिला आघाडीने यावर स्पष्टीकरण द्यायला हवं,” असं प्रकाश महाजन म्हणाले.

आणखी वाचा – Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार? २२ जानेवारीच्या एजीएम बैठकीनंतर घेणार निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपा ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करेल, असं मला वाटतं नाही. कारण, ब्रिजभूषण सिंह हे उत्तरप्रदेशचे शिक्षण सम्राट आणि बाहुबली आहे. तसेच, ब्रिजभूषण सिंह हे एकाद्या महिलेला अत्याचाराचे पुरावे मागतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. महिलेवर झालेल्या अत्याचाराचा काय पुरावा देणार. अत्याचार सार्वजनिक जागेवर झालेला थोडीच असतो. अशा लोकांचा पदावरून हटवलं पाहिजे,” अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.