परभणी : अ‍ॅल्युमिनियमची तार चोरी करणार्‍या दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्यामार्फत ही तार खरेदी करणार्‍या आरोपीलाही पोलीसांनी पकडले आहे. दोन वाहनासह एकूण तेरा लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपींकडून पोलीसांनी हस्तगत केला आहे.

जिल्हयात होत असलेल्या तार चोरी, अ‍ॅल्युमीनीयम व तांबे चोरीच्या अनुषंगाने माहीती काढुन गुन्हे उघड करावेत व आरोपी निष्पन्न करुन मुदेमाल हस्तगत करण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, आरोपी लक्ष्मण भागोजी पवार (रा. गव्हा ता. परभणी), जय भगवान काळे ( रा.नृसिंह साखर कारखाना जवळ, शिंगनापुर) यांनी व त्याच्या इतर साथीदारांनी मिळुन निपाणी टाकळी ते करडगाव रोड सेलु येथील तसेच जिल्हयातील इतर भागातील विजेच्या खांबावरील अ‍ॅल्युमिनीयम तार चोरी केली. ही माहीती मिळाल्याने सापळा लावुन शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी जिल्हयात मागील एक वर्षापासुन झालेल्या पोलवरील ॲल्युमीनीयम तार चोरीबाबत त्यांनी कबूल केले. (मॅक्स पिकअप क्र. एमएच ४१, जी ३०१० व लक्ष्मण पवार यांचे टाटा एस क्र एम एच २२ ए एन ३८३५ अशी वाहने आळीपाळीने वापरत असल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरी केलेली अ‍ॅल्युमिनीयम तार सयद कलीमोदीन सयद जैनुलाबदीन (रा. काद्राबाद प्लॉट परभणी) यांना विक्री केल्याचे या दोन आरोपींनी सांगितले. आरोपी व त्यांच्या साथीदारांनी चारचाकी वाहनाने परभणी जिल्हयातील गंगाखेड १, सेलु ३, दैठणा २, ताडकळस १ परभणी ग्रामीण १ असे ८ गुन्हे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडुन चोरी करुन विक्री केलेल्या मुद्देेमालाच्या रक्कमेपैकी ३ लाख, ५० हजार रु नगदी, दोन चारचाकी वाहने व तीन मोबाईल असा एकुण १३ लाख ८० हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्री.यशवंत काळे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे श्री. विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वखाली पथकाने केली.