scorecardresearch

कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशींचे जात प्रमाणपत्र अवैध

समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर, सदस्य सचिव डॉ. दीपक खरात, सदस्य संजय दाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष नारायण बोरीकर यांनी केलेल्या तक्रारीवर वरीलप्रमाणे निकाल दिला आहे.

barti
प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचे राजपूत भामटा (विमुक्त जाती) या जातीच्या प्रमाणपत्रावरून मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अखेर निकालात काढला आहे. या समितीने डॉ. सूर्यवंशी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला आहे.

समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर, सदस्य सचिव डॉ. दीपक खरात, सदस्य संजय दाणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष नारायण बोरीकर यांनी केलेल्या तक्रारीवर वरीलप्रमाणे निकाल दिला आहे. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना कन्नडच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजपूत भामटा या जातीच्या प्रमाणपत्राबाबत समितीकडे तक्रार करण्यात आली होती. त्या नुसार शिक्षण सहसंचालक कार्यालयाने डॉ. सूर्यवंशी यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याबाबत तथा वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत डॉ. सौ. इं.भा. पा. महिला कला महाविद्यालयाच्या प्राचार्याना कळवण्यात आले होते. महाविद्यालयानेही त्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Registrar dr jayashree suryavanshi caste certificate invalid university registrar social justice ysh

ताज्या बातम्या