औरंगाबाद – जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांनी जातीच्या दाव्यासंदर्भाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका न्या. आर. डी. धनुका व न्या. एस. जी. मेहरे यांनी शुक्रवारी फेटाळली. आमदार सोनवणे यांनी अनुसूचित जमातीमधील ‘टोकरे कोळी’ या जातीच्या प्रमाणपत्रावर चोपडा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. खंडपीठाने चार आठवड्यांसाठी आमदार सोनवणे यांच्यावर आदेशाच्या अनुषंगाने कुठलीही फौजदारी कारवाई करण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले आहे.

आमदार सोनवणे यांच्या जातीच्या दाव्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या जातीच्या दाव्यासंबंधी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती. डिसेंबर २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र तपासणी समितीने संबंधित दावा अवैध ठरवला होता. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबारच्या निर्णयाविरुद्ध आमदार लताबाई सोनवणे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान देण्यात आले होते. नंदुरबार तपासणी समितीचा निर्णय रद्द करून अनुसूचित जमातीमधील टोकरे कोळी हे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात यावे, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती. प्रतिवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार वळवी यांनी सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे अशी विनंती केली होती. वळवी यांच्या वतीने ॲड. योगेश बोलकर यांच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी बाजू मांडली तर याचिकाकर्त्या सोनवणे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांनी काम पाहिले.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Yavatmal Lok Sabha seat, mahayuti, lok sabha 2024, maha vikas aghadi, Candidate, Lack of Local, Performance Record, wrath of citizens, yavatmal politics news, washim politics news, washim news,
लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा
Chandrakant Patil instructs angry workers to leave the hall in maval
महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना