छत्रपती संभाजीनगर : जून महिन्यापासून येणाऱ्या पूरात मराठवाड्यात २ हजार ५३४ जनावरे दगावली. २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २० सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत फक्त सहा दिवसात ३५७ जनावरे दगावली. यामध्ये नव्या निकषानुसार दुधाळ मोठ्या जनावरांसाठी ३२ हजार, लहान जनावरांसाठी चार हजार अशी मदत देण्याबाबतचे निकष आहेत. परिणामी धाराशिव जिल्ह्यात खवा निर्मितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या भागात आता चाराही नसल्याचे शेतकरी सांगत आहे. शेतकरी हैराण आहेत.
जनावरांच्या मृत्यूमुळे तसेच चारा नसल्याने २५ टक्के दूध उत्पादन घटले असल्याचे खवा उत्पादक विनोद जोगदंड यांनी सांगितले. या भागात खवा उत्पादन ३० प्रकल्प आहेत. एका प्रकल्पात ५०० किलो तयार होतो. तसेच ६०० भट्ट्या आहेत. सुमारे सात टन खवा उत्पादन दररोज होते. आता ते घटले आहे.जनावरांच्या मृत्यूमुळे तसेच चारा नसल्याने गेल्या २५ टक्के दूध घटले. या तालुक्याचे माजी आमदार राहुल मोटे म्हणाले, चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. पाऊस् थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे नव्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दूध उत्पादकांसमोर मोठी अडचण झाली आहे. या तालुक्यात सर्वाधिक दूध उत्पादन होते.
सोयाबीन शेतकरी संकटात, प्रक्रिया उद्योगावर परिणाम नाही
सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात असला तरी सोयाबीन प्रक्रिया उद्योगावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे उद्योजक हेमंत वैद्य यांनी सांगितले. गेल्या वर्षी सरकारने हमीभावापेक्षा बाजारभावातील सोयाबीनचे दर कमी असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. हे सोयाबीन आता पुन्हा विक्रीस काढले आहे. त्यामुळे खाद्यतेल प्रक्रिया उद्योगावर त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. पण अतिवृष्टीमुळे २५ टक्के उत्पादन घटेल, असे सांगण्यात येत आहे.