छत्रपती संभाजीनगर: मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या मामाला व त्यांच्या मुलाला दुचाकीवरून जाताना पाठीमागून जीपची धडक देत उडवले. त्यानंतर जीप माघारी फिरवून जखमी मुलास चिरडून ठार केल्याची घटना शेंदुरवादा ते सावखेडा मार्गावर गुरुवारी घडली. प्रथम दर्शनी अपघात भासवण्याचा प्रयत्न केल्यानंतर जखमी मामाने दिलेल्या फिर्यादीनंतर वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री ८.३० च्या सुमारास नोंद झाला आहे. ऑनर किलिंग सारख्या प्रकाराने वाळूज, गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली.

या घटनेत पवन मोरे (वय २६) याचा मृत्यू झाला. शिवराम मोरे हे जखमी झाले. गंगापूर तालुक्यातील वझर येथील रहिवासी असलेले शिवराम मोरे यांच्या फिर्यादीनुसार ते स्वतः व मुलगा पवन हे दोघे शेंदुरवादाहून दुचाकीवर बसून गावाकडे गुरूवारी दुपारी जात होते.काही अंतरावर जात असतांनाच पाठीमागून भरधाव आलेल्या (एम.एच.२० ई वाय ०६४५)  जीप चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील शिवराम मोरे हे जोरात बाजुला फेकल्या गेले. मात्र त्यांचा मुलगा पवन हा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच कोसळला. धडक देणाऱ्या चालकाने वळण घेऊन जीप आणत पवनला अक्षरशः चिरडून टाकले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक देणारे आणि दुचाकीवरील बाप-लेक हे परस्परांचे नातेवाईक आहेत. मृत पवनचे येत्या ४ एप्रिल रोजी नियोजित लग्न ठरलेले होते. शेतकरी तथा ऊसतोड मुकादम असलेले शिवराम मोरे यांचा चितेगाव येथील भाचा विशाल नवले याने धूपखेडा (ता. पैठण) येथील सचिन वाघचौरे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्या रागातून सचिन याने इतरांच्या संगणमताने दुचाकीला धडक देऊन मुलाला चिरडून मारल्याचे शिवराम मोरे यांनी जबाबात सांगितले.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

या प्रकरणाची माहिती मिळताच वाळूजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली. मृत पवनचे वडिल शिवराम एकनाथ मोरे (४३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन भागचंद वाघचौरे (रा.धुपखेडा ता.पैठण) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने करीत आहेत.