सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. किंमती वाढल्याने ग्राहकांचे बजट बिघडले आहे. दुचाकीने दररोज ऑफिसला ये जा करणाऱ्यांना तर या वाढलेल्या किंमती अधिकच सतावत आहेत. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरत आहे. तसेच ते पर्यावरणपुरकही आहे. पण या वाहनांच्या किंमती अधिक आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कुटर मोठ्या बचतीसह हवी असेल तर ईव्हीयम स्कुटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

या महिन्यात Eveium स्मार्ट मोबिलिटी कंपनी आपल्या cosmo, comet आणि czar या तीन इलेक्ट्रिक स्कुटरवर मोठी सूट देत आहे. या तिन्ही स्कुटरवर १५ हजार ४०१ रुपयांची मोठी सूट मिळत आहे.

(पावसात प्रवास करण्यापूर्वी बाईकमधील ‘या’ गोष्टी तपासा, सुखद आणि सुरक्षित होईल प्रवास)

काय आहे ऑफर?

1) कोस्मो

कोस्मो इलेक्ट्रिक स्कुटरची एक्स शोरूम किंमत १ लाख ३९ हजार २०० रुपये आहे. यावर कंपनी १२ हजार ७०१ रुपयांचा फेस्टिव्ह ऑफर देत आहे. सूट नंतर हे स्कुटर तुम्ही १ लाख २६ हजार ४९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. कोस्मोमध्ये ७२ वोल्टची बॅटरी देण्यात आली आहे, जी ४ तासांत चार्ज होते. २ हजार वॉटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. स्कुटरची सर्वोच्च स्पिड ६५ किमी प्रति तास आहे. एकदा चार्ज केल्यावर ही स्कुटर ८० किलोमीटर चालते. अर्जेंट ब्लॅक, कोल्ड ब्लॅक, पर्ल ग्रे, मुनलाईट व्हाइट, सॅटिन रेड, ऑरोरल येलो, हेजी ब्ल्यू आणि मिंटेड ग्रीन या कलरमध्ये ही स्कुटर उपलब्ध आहे.

२) कॉमेट

कॉमेट स्कुटरची एक्स शोरूम किंमत १ लाख ८४ हजार ९०० रुपये आहे. स्कुटरवर १५ हजार ४०१ रुपयांची सूट मिळत आहे. सूट नंतर ही स्कुटर १ लाख ६९ हजार ४९९ रुपयांना मिळत आहे. कॉमेटमध्ये ७२ वोल्ट आणि 50 एएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ४ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. स्कुटरमध्ये ३ हजार वॉटची मोटर देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर ही स्कुटर १५० किमी अंतर पार करू शकते. स्कुटर ८५ किमी प्रति तासाची सर्वोच्च स्पिड देते.

(वेळ दवडू नका, कार घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करा, पुढील वर्षी ‘या’ कारणांमुळे वाढणार किंमती)

३) सीझार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीझार स्कुटरची एक्स शोरूम किंमत २ लाख ७ हजार ७०० रुपये आहे. स्कुटरवर १५ हजार रुपयांची मोठी सूट देण्यात आली आहे. यामुळे स्कुटरची किंमत १ लाख ९२ हजार ४९९ झाली आहे. स्कुटर ८५ किमी प्रति तासाची सर्वोच्च स्पिड देते. सिंगल चार्जवर स्कुटर १५० किमी पर्यंत चालते. स्कुटरमध्ये ४ हजार वॉटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. यात ७२ वॉट आणि ४२ एएच लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ४ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.