होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया या देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपली स्पोर्ट्स कॅफे रेसर 2022 Honda CB300R बाइक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. मध्यम आकाराच्या बाइक सेगमेंटमध्ये निवडक बाइक्सची उपस्थिती लक्षात घेऊन कंपनीने या सेगमेंटमध्ये ही बाइक लॉन्च केली आहे. कंपनी या बाइकची विक्री होंडाच्या बिगविंग प्रीमियम रिटेल चेनद्वारे करणार आहे, ग्राहक बुकिंगद्वारे ही गाडी खरेदी करू शकतील. तुम्हालाही ही बाईक विकत घ्यायची असेल, तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून जवळच्या होंडा बिगविंगबद्दल माहिती घेऊन, तुम्ही तिथून ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन्ही बुक करू शकता.

कंपनीने 2022 Honda CB300R गाडी २.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीसह सादर केली आहे. तरुणाईला लक्षात घेऊन कंपनीने हे आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन रंगसंगतीसह मॉडेल सादर केले आहे. कंपनीचे विक्री आणि विपणन संचालक, यादविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले की, “ही बाईक CB300R असिस्ट आणि स्लिपर क्लचसह डिझाईन केली आहे. यामुळे लांब पल्ला गाठताना थकवा कमी होईल. याशिवाय यात दिलेले गोल्डन डाउन फॉर्क्स बाईक रायडिंगला अचूक आणि अधिक स्पोर्टी फील देतात.” बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने २८६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. ३१.१ एचपी पॉवर आणि २७.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत ६ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, कंपनीने ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह त्याच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये हबलेस फ्लोटिंग डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे.

Honda Activa 125 vs TVS Jupiter 125: किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ?, जाणून घ्या

कंपनीने नवीन तंत्रज्ञान आणि रेट्रो डिझाइनचे मिश्रण केले आहे. ज्यामध्ये डिजिटल डिस्प्ले, रेट्रो डिझाईन आकर्षक इंधन टाकी, स्प्लिट सीट, आकर्षक ब्लॅक अलॉय व्हील, इंजिन ब्लॉक प्रोटेक्टरसह वर्तुळाकार डिझाइन एलईडी हेडलॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स यांसारखे फिचर्स दिले आहेत.