scorecardresearch

Maruti Ertiga facelift 2022: फक्त ११ हजार भरून ७ सीटर MPV करा बुक, लाँच तारखेपासून फिचर्सपर्यंत माहिती जाणून घ्या

मारुती सुझुकी १५ एप्रिल २०२२ रोजी एमपीव्ही सेगमेंटमध्ये आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार मारुती एर्टिगाचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे.

Maruti-Ertiga-facelift-2022
Maruti Ertiga facelift 2022: फक्त ११ हजार भरून ७ सीटर MPV करा बुक, लाँच तारखेपासून फिचर्सपर्यंत माहिती जाणून घ्या (फोटो- MARUTI SUZUKI)

मारुती सुझुकी १५ एप्रिल २०२२ रोजी एमपीव्ही सेगमेंटमध्ये आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार मारुती एर्टिगाचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. परंतु त्याआधी कंपनीने या कारची प्रतीक्षा करत असलेल्या लोकांसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. तुम्हाला पुढील पिढीतील मारुती एर्टिगा फेसलिफ्ट घ्यायची असेल, तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या मारुती डीलरशिपला भेट देऊन बुक करू शकता. या एमपीव्हीच्या बुकिंगसाठी कंपनीने ११ हजार रुपयांची टोकन रक्कम द्यावी लागेल.

मारुती एर्टिगा ही कंपनीच्या एमपीव्ही सेगमेंटची लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने पेट्रोल आणि सीएनजी किटसह हायब्रिड इंजिनचा पर्यायही दिला आहे. कंपनीने यामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अपडेट करण्यात आले आहे. यात अपग्रेड केलेल्या पॉवरट्रेनसह सहा-स्पीड ट्रान्समिशन दिले आहे. याशिवाय तिसर्‍या रांगेसाठी वन टच रिक्लिनर चेअर, मल्टी-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि नवीन डिझाइन केलेल्या आरामदायी लेदर आसनांचा समावेश करण्यात आला आहे. Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी व्हेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Kia Sonet आणि Seltos चे अपडेटेड मॉडेल्स लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

मारुती एर्टिगा फेसलिफ्टमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD, ISO फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हिल होल्ड असिस्टसह मागील पार्किंग कॅमेरा, सेंट्रल कार पार्किंग सेन्सर्स, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक सुविधा मिळतील. कंपनीने कारच्या मायलेजबद्दल अद्याप खुलासा केलेला नाही. त्याचबरोबर कंपनीने मारुती एर्टिगा फेसलिफ्टच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही, कंपनी ९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह टॉप व्हेरियंटमध्ये ११.५० लाख रुपयांपर्यंत असू शकते, असा तज्ज्ञांचं मत आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2022 maruti suzuki ertiga launch next week know feature and booking process rmt

ताज्या बातम्या