Hyundai Motor India ची सर्वाधिक विक्री होणारी कार Creta SUV अलीकडेच अपडेट करण्यात आली आहे. फेसलिफ्टेड मॉडेल लाइनअप E, EX, S, S (O), SX आणि SX (O) ट्रिम्समध्ये येते, एकूण १९ प्रकार आहेत. Hyundai Creta ही सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV आहे. या कारची दर महिन्याला प्रचंड विक्री होते. या नव्या वर्षाच्या सुरुवातीला कारमध्ये फेसलिफ्ट अपडेट मिळाले आहे. ही कार आणखी सुरक्षित होऊन बाजारपेठेत दाखल झाली आहे.
नवीन Hyundai Creta फेसलिफ्टला चांगली मागणी आहे, कंपनीला त्यासाठी २५,००० पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. अशा स्थितीत यावरील प्रतीक्षा कालावधीही लांबला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या नवीन क्रेटा पेट्रोल व्हेरियंटचा प्रतीक्षा कालावधी सुमारे ३-४ महिने आहे तर डिझेल प्रकाराची डिलिव्हरी ४-५ महिन्यांवर पोहोचला आहे. हे लक्षात घ्या, एसयूव्हीचे प्रकार, रंग आणि शहरानुसार प्रतीक्षा कालावधी बदलू शकतो.
(हे ही वाचा : दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! टाटाने खेळला नवा गेम; देशात दाखल केली ट्विन सिलिंडर असलेली कार, बुकिंगही सुरु )
नवीन Hyundai Creta फेसलिफ्ट तीन पॉवरट्रेन पर्यायांसह येते. १६०bhp, १.५L टर्बो पेट्रोल, ११५bhp, १.५L पेट्रोल आणि ११६bhp, १.५L डिझेल. टर्बो-पेट्रोल इंजिन केवळ DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे, तर १.५L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल युनिट मॅन्युअल किंवा CVT गिअरबॉक्ससह असू शकते. तर, डिझेल प्रकार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
फेसलिफ्टेड Hyundai Creta विक्रीच्या बाबतीत यश मिळवत आहे. यासोबतच, Hyundai आता N-Line व्हेरिएंट सादर करून आपल्या SUV मॉडेल लाइनअपचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्याचे N-Line प्रकार २०२४ च्या मध्यापर्यंत येणे अपेक्षित आहे. Hyundai Creta N-Line ही बाजारात Kia Seltos GTX+ आणि X Line शी स्पर्धा करेल, जे अधिक स्पोर्टी स्वभावासह येतील. हे टर्बो पेट्रोल आणि डीसीटी इंजिन-गिअरबॉक्ससह सुसज्ज असू शकते, ज्यामध्ये एन-लाइन विशिष्ट घटक आत आणि बाहेर दोन्ही दिसू शकतात.
सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून, नव्या फेसलिफ्टमध्ये एकूण ६ एअरबॅग्ज, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, EBD आणि ESP मिळतील. 2 ADAS Technology सह समर्थित आहे, ज्यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्सचा समावेश आहे. यात ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अवॉयडन्स असिस्ट, अवॉयडन्स असिस्टसह फॉरवर्ड कोलिजन अलर्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, लेन फॉलो असिस्ट, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फ्रंट व्हेइकल डिपार्चर वॉर्निंग, अलर्ट यांचा समावेश आहे. असिस्ट, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
पेट्रोल प्रकारांची किंमत ११ लाख ते २० लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर डिझेल प्रकारांची किंमत १२.४५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २० लाखांपर्यंत जाते.