Kia EV6 Electric SUV : साउथ कोरियन कार कंपनी Kia ने जानेवारी महिन्यात भारतात मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये आपली नवी इलेक्ट्रिक एसयुव्ही Kia EV6 लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक कारचा फेसलिफ्ट मॉडेल विक्रीसाठी भारतीय मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत. कंपनीने फक्त एक सिंगल व्हेरिअंट GT लाइन AWD बरोबर लाँच केले आहे ज्याची सुरुवातीची किंमत ६५.९ लाख रुपये आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, या कारमध्ये नवीन आणि मोठा बॅटरी पॅक असून जो चांगला ड्रायव्हिंग रेंज प्रदान करण्यास मदत करणार आहे. जाणून घेऊ या या इलेक्ट्रिक एसयुव्हीविषयी

काय आहे नवीन?

Kia EV6 च्या फेसलिफ्ट मॉडेलचा लुक आणि डिझाइनमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. कारच्या बाहेरील भागात नवीन बंपर आणि स्टार मॅप हेडलाइट्स आहेत. या सिग्नेचर लाइट्स फ्लॅगशिप किआ EV9 एसयूव्ही आणि ओवरसीज मार्केट मध्ये विकली जाणारी EV3 मध्ये दिसू शकते. १९-इंचीचा अलॉय व्हिल्स आणि रियर बंपर आणि टेल-लाइट्सचा समावेश केला आहे.

कारच्या साइजमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही पण तरीसद्धा मोठी बॅटरी त्यात फिट करण्यात यश आले आहेत. कंपनीने दावा केला आहे की ही बॅटरीची कार्यक्षमता चांगली असेल.

पावर

Kia EV6 मध्ये कंपनी ने पुढे आणि मागे दोन्ही इलेक्ट्रिक मोटर्स दिले आहेत जे ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम बरोबर आहे. हे दोन्ही इलेक्ट्रिक मोटर मिळून ३२५ hp चा पावर आउटपुट आणि ६०५ Nm चा टॉर्क निर्माण करते. कंपनीने दावा केला आहे की ही कार फक्त ५.३ सेकंदामध्ये ० ते १०० किमी/तासाच्या वेगाने धावते. या कारला इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) पर तयार करण्यात आले ज्यामध्ये फ्लोअर-माउंटेड बॅटरी लावली आहे.

६६३ किमी रेंज , १८ मिनटांमध्ये चार्ज

यामध्ये ८४ kWh निकेल-मॅगनीज-कोबाल्ट (NMC) बॅटरी पॅक दिला आहे. प्री-फेसलिफ्ट मॉडल मध्ये ७७.४ kWh ची बॅटरी दिली जात होती. ही NMC बॅटरी वजनाला खूप हलकी असते. कंपनीने दावा केला आहे की सिंगल चार्जमध्ये ही कार ६३३ किमी (ARAI) ची रेंज प्रदान करते. याशिवाय ३५०kW ची क्षमता DC फास्ट चार्जरपासून बॅटरीला १८ मिनटांमध्ये १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतात जेव्हा ५०kW DC चार्जरपासून ७३ मिनिटं लागतात.

केबिन आणि फीचर्स

कारच्या आतील भागात, किआने एक नवीन थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हिल जोडले आहे ज्यामध्ये एक डेडिकेटेड ड्राइव्ह मोड बटन मिळते. ते एका नवीन फिंगरप्रिंट सेंसर रजिस्टर्ड ड्रायव्हरशिवाय चावीचा वापर करून कार ला स्टार्ट करण्याची सुविधा प्रदान करतो. किआ ने कर्व्ड पॅनोरमिक स्क्रीनला टिकवून ठेवण्यासाठी त्यात इंस्ट्रूमेंटेशन आणि इंफोटेनमेंटसाठी दोन १२.३ इंचीचा डिस्प्ले दिला आहे.

फीचर्सच्या लिस्ट मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो और अॅप्पल कारप्ले, एम्बिअंट लाइटिंग, वायरलेस चार्जर, 360-डिग्री कॅमरा, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, १४ -स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, व्हीकल-टू-लोड (V2L) आणि व्हीकल-टू-व्हीकल (V2V) चार्जिंग फंक्शन आणि ओवर-द-एयर (OTA) सॉफ्टवेअर समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेफ्टी फीचर्स

नवीन Kia EV6 एसयूव्ही मध्ये सेफ्टी फीचर्स म्हणून एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-होल्ड असिस्ट, फ्रंट पार्किंग सेन्सर आणि ८ एअरबॅग दिला आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अँडवान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) प्रमाणे चांगले सेफ्टी फीचर दिले आहेत ज्यामध्ये १७ नवीन फीचर्सचा समावेश आहे. एकूण फिचर्सची संख्या २७ आहे.