शाहरुख खान आणि ह्युंदाई मोटर इंडिया एलटीडीच यांचे नाते खूप जुने आहे. शाहरुख खान ह्युंदाईचा अॅम्बेसेडर आहे. तसेच काळानुसार ह्युंदाई आणि शाहरुख खानचे नाते अधिक घट्ट होत आहे. आता हे नाते आणखीन खास होणार आहे. कारण- प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही ह्युंदाई Ioniq 5 ही गाडी कंपनीने शाहरुख खानला दिली आहे. हा प्रसंग खूप खास आहे. कारण- अलीकडेच ह्युंदाई Ioniq 5 ने १००० युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे आणि त्याचे ११०० वे युनिट बॉलीवूड स्टार शाहरुख खानला देण्यात आले आहे.
ह्युंदाईने या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये Ioniq 5 ही गाडी लाँच केली आणि तिच्या १००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्रीही झाली. म्हणजेच Ioniq 5 ला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणूनच इलेक्ट्रिक एसयूव्ही Ioniq 5 चे ११०० वे युनिट शाहरुख खानला देण्यात आले; जे त्याच्या कार कलेक्शनमधील पहिले ईव्हीदेखील आहे.
खास कार्यक्रमात बोलताना ह्युंदाई मोटर इंडिया एलटीडीचे एमडी व सीईओ उनसू किम म्हणाले, “२५ वर्षांपासून शाहरुख खान ह्युंदाई कंपनीशी जोडला गेला आहे. त्यामुळे ही उद्योगातील सर्वांत दीर्घकालीन ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पार्टनरशिप आहे. ह्युंदाई कंपनीमधील शाहरुख खानच्या पाठिंब्याबद्दल आम्हीच खरंच कृतज्ञ आहोत. तसेच आशा आहे की, आमची पार्टनरशिप पुढील अनेक वर्षं अशीच टिकून राहील. या खास प्रसंगी आभार मानण्यासाठी आम्ही आमची फ्लॅगशिप ईव्ही आयोनिक 5 शाहरुख खानला देत आहोत.”
हेही वाचा…ना बजाज, ना हिरो कोणीच टिकणार नाय? आता होंडाची बाईक देशात नव्या अवतारात दाखल होणार
२५ वर्षांचा प्रवास :
तसेच कृतज्ञता व्यक्त करताना बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान म्हणाला की, ही माझी पहिली ईव्ही आहे आणि मला आनंद आहे की, ती ह्युंदाई कंपनीची आहे. ह्युंदाई आणि २०२३ हे वर्षं खरोखरच माझ्यासाठी खास ठरलं आहे. भारतातील लोकांकडून ह्युंदाई कंपनीला मिळालेलं प्रेम ही बाब उद्योगातील आमची प्रेरणा आणि ताकद आहे. ह्युंदाई मोटर इंडिया कुटुंबाचा मी सगळ्यात जुना सदस्य असल्याने आमचा २५ वर्षांचा प्रवास माझ्यासाठी आणि ब्रॅण्डसाठी खरोखरच लाभदायक ठरला आहे. तसेच यादरम्यान आम्ही एकत्रितरीत्या उत्कृष्ट असे क्षण अनुभवले आहेत.
ह्युंदाई Ioniq 5 प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत ४५.९५ लाख रुपये आहे. या ईव्हीमध्ये ७२.६ kWh ची बॅटरी आहे; जी एका चार्जवर ६३१ किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकते. ही पाच सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही लूक आणि फीचर्सच्या बाबतीत खूपच चांगली आहे.