थारला देशात फोर्स मोटरची गुरखा तगडे आव्हान देत आहे. सध्या फोर्स मोटरकडे ३ डोअर गुरखा हे वाहन आहे जे थेट महिंद्रा थारला टक्कर देते. मात्र, आता कंपनी फोर्स गुरखाचे ५ डोअर व्हर्जन लाँच करणार आहे. ५ डोअर फोर्स गुरखा हे कंपनीचे नवे फ्लॅगशिप मॉडेल आहे. या वानाची लवकरच लाँचिंग होण्याची शक्यता आहे, कारण कंपनीने डिलर स्टाफ ट्रेनिंग सुरू केली आहे. महिंद्रा देखील थारचे ५ डोअर व्हर्जन लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही वाहनांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळेल.
५ डोअर फोर्स गुरखाचे फीचर
नव्या ५ डोअर फोर्स गुरखाचे फीचर ट्रॅक्स क्रुजर सारखेच वाटते. वाहनात जी क्लासशी प्ररित डिजाइन मिळते, जे खूप लोकांना आकर्षित करते. ऑफरोडिंगसाठी तिला थारपेक्षा चांगले मानले जाते कारण, या वाहनाच्या मागे आणि पुढे मेकॅनिकल लॉकिंग डिफरेन्शियल (MLD) फीचर मिळते.
वाहनात मागील खिकडीसाठी पावर बटन मिळत आहे, जे मागील दरवाज्यावर आहे. पुढील दरवाजांच्या खिडक्यांचे नियंत्रण अजूनही सेंटर कन्सोलवर अवलंबून आहे. वाहनाला दुसऱ्या आणि तिसऱ्या रोमध्ये कॅप्टन सीटबरोबरच ६ सीटर लेआऊटमध्ये सादर केले जाऊ शकते. त्याचबरोबर, दुसऱ्या रोमध्ये बेंच आणि तिसऱ्या रोमध्ये कॅप्टन सीटसह ७ सीटर लेआऊटमध्ये हे वाहन सादर होऊ शकते. इतकेच नव्हे तर ९ सीटर ऑप्शनसाठी वाहनात थर्डरोमध्ये जंप सीट्स देखिल दिले जाऊ शकतात.
इतकी आहे किंमत
सध्या ३ सीटर गुरखाची किंमत १४.७५ लाख रुपये आहे. कमी वैशिष्टे असलेल्या ५ डोअर गुरखा वाहनाची किंमत ३ डोअर गुरखाच्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमी राहू शकते. अधिक वैशिष्ट्ये असलेल्या ५ डोअर गोरखाची किंमत १५.५ ते १६ लाख रुपये असू शकते. ५ डोअर गोरखा ही ५ डोअर महिंद्रा थार आणि ५ डोअर मारुती सुझुकी जिम्नीला आव्हान देईल.