देशात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, रस्त्यांवर खूप वर्दळ दिसून येते. त्यातच काही लोक व्यवस्थित वाहन चालवत नाही. वेगाने किंवा कशेही चालवतात, त्यामुळे इतरांना वाहन चालवताना समस्या होतात. अशा लोकांमुळे अपघात देखील घडतात. आता तर दिवाळी आहे. सणासुदीच्या दिवसांत तर रस्त्यांवर वाहनांची भरपूर गर्दी असते. रस्त्यावर मुले फटाके फोडताना दिसून येतात. प्रदूषणाची समस्या. त्यामुळे, दिवाळीमध्ये वाहन चालवताना सतर्क राहिले पाहिजे. दिवाळीत वाहन चावताना सुरक्षित प्रवासासाठी पुढील ५ गोष्टी लक्षात ठेवा.

१) वाहनाची खिडकी बंद ठेवा

छोट्या मोठ्या आकारात फटाके येतात. फाटाका दूर जरी फुटला तरी त्याचे अवशेष हे खिडकीतून वाहनात शिरू शकतात. त्यामुळे, प्रवास करताना आपली खिडकी बंद ठेवा.

(सेकंड हँड कार घ्यायची की नवी? ‘ही’ माहिती वाचून निवडणे होईल सोपी)

२) एसी बंद ठेवा

फटाके फुटत असलेल्या ठिकाणी एसी बंद ठेवा. फटाक्याचा धूर मानव आणि प्राण्यांसाठी घातक असतो. कारमध्ये धूर अडवणारे फिल्टर्स असतात. ते कॅबिनमध्ये हा धूर जावू देत नाही, तरी देखील कारचे एसी बंद ठेवलेले बरे.

३) फटाक्यावरून वाहन नेऊ नका

फटका पेटताना दिसल्यास कार लगेच थांबवा. तो फुटल्यानंतर वाहन पुढे न्या. जाणे गरजेचेच असेल तर फटाक्यापासून लांब अतरावरून कार पुढे न्या. फटाक्यावरून कार नेऊ नका. कारखाली वायरींग, रबर आणि इतर साहित्य असतात ज्यांना आग लागू शकते.

४) पुढे जायचे असल्यास फटाका फोडणाऱ्याला कळवा

कोणी फटाका फोडायच्या तयारीत असेल, मात्र त्याआधी तुम्हाला पुढे जायचे असेल तर मग हॉर्न वाजवा, हेडलाइट फ्लॅश करून फटाका फोडणाऱ्याला कळवा. मगच पुढे जा.

(कार दीर्घकाळ बंद ठेवू नका, अधूनमधून चालवत राहा, अन्यथा होईल ‘हे’ मोठे नुकसान)

५) वाहन हळू चालवा

दिवाळीत रस्त्यावर फार वर्दळ असते. लहान मुले असतात, मोठी व्यक्ती असतात, त्यामुळे वाहन चालवताना हळू चालवा. हळू चालवल्यास तुमच्या वाहनाच्या मागेपुढे कोण आहे. वाहन काढण्यासाठी किती जागा आहे. या सर्व गोष्टींचा अंदाज येतो.