6 fastest sports cars in the world | Loksatta

‘या’ आहेत जगातील सर्वात वेगवान कार्स, लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

आज आपण जगातील काही सर्वात वेगवान ६ वाहनांविषयी जाणून घेऊया. त्यांना टॉप स्पिडवर चालवण्याची कोणाचीही हिंमत होईल असे वाटत नाही. आणि धाडस हा जिवावर बेतू शकतो.

‘या’ आहेत जगातील सर्वात वेगवान कार्स, लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
स्पोर्ट कार (source – venomgt)

आलिशान फीचर, आणि मायलेज हे कार चाहत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र काहींना वेगही आवडतो. वेगवान कार तुम्हाला कमी वेळात अधिक अंतर पार करण्यात मदत करते. मात्र ते धोकादायकही आहे. वेग मर्यादा ओलांडल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. आज आपण जगातील काही सर्वात वेगवान ६ वाहनांविषयी जाणून घेऊया. त्यांना टॉप स्पिडवर चालवण्याची कोणाचीही हिंमत होईल असे वाटत नाही. आणि धाडस हा जिवावर बेतू शकतो.

1) एसएससी टुआटारा

source – ssc north america

SSC Tuatara ही जगातील सर्वात वेगवान कारपैकी एक आहे. या कारची टॉप स्पिड ४४५ किमी प्रति तास आहे. कारमध्ये ट्विन टर्बोचार्ज्ड ५.९ लिटर इंजिन आहे, जे ७५० एचपीची कमाल शक्ती निर्माण करते.

२) अगेरा आर एस

source – koenigsegg

Koenigsegg Agera RS ही जगातील देखील वेगवान कार आहे. या कारचा सर्वोच्च वेग ४४७ किमी प्रति तास आहे. कारमध्ये ५.० लिटरचे ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन आहे, जे ११६० एचपीची शक्ती निर्माण करते. ही कार जगातील केवळ ११ लोकांकडे आहे.

३) हेनेसे वेनम जीटी

source – venomgt

Hennessey Venom GT ही देखील वेगवान कारच्या यादीत येते. या कारचा सर्वोच्च वेग ४३५ किमी प्रति तास आहे. कारमध्ये ७.० लीटर व्ही ८ इंजन आहे जे १२४४ एचपीची शक्ती निर्माण करते. या कारच्या नावे ५.६ सेकंदात १६० किमी प्रति तासाचा वेग पकडल्याचा विक्रम आहे.

४) बुगाटी चिरोन

source – bugatti

Bugatti Chiron या कारचा सर्वोच्च वेग ४२० किमी प्रति तास आहे. कारमध्ये ८.० लिटर टर्बो चार्ज्ड डब्ल्यू १६ इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन १४७९ एचपीची शक्ती निर्माण करते.

५) बुगाटी व्हेरॉन सुपर स्पोर्ट

source – bugatti

Bugatti Veyron Super Sport या कारचा सर्वोच्च वेग ४१५ किमी आहे. या कारमध्ये ८.० लीटर क्वाड टर्बो चार्ज्ड डब्ल्यू १६ इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन १२०० एचपीची शक्ती निर्माण करते.

६) एसएससी अल्टिमेट एरो टीटी

source – wikipedia

SSC Ultimate Aero TT या कारची टॉप स्पिड ४१२ किमी प्रति तास आहे. या कारमध्ये ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन देण्यात आले आहे जे १२८७ एचपीची शक्ती देते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 5 October 2022: आज पेट्रोल-डिझेलचे भाव काय? जाणून घ्या इंधनाचे नवे दर

संबंधित बातम्या

पंतप्रधानांच्या हस्ते ‘समृद्धी’चे उद्या उद्घाटन; मुंबई-नागपूर महामार्गामुळे राज्याच्या विकासाला वेग : मुख्यमंत्री
“मी आता मूकभाषा शिकणार आहे”, वादग्रस्त वादानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले, “ती क्लिप…”
अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
‘सिर्फ तुम’ चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया गिल सध्या काय करते? जाणून घ्या कुठे आहे अभिनेत्री
Shraddha Walker murder case : श्रध्दा वालकर हत्या प्रकरण; विकास वालकर यांचे आरोप वसई पोलिसांनी फेटाळले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
India Bangladesh 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध सपशेल अपयशाची नामुष्की टाळण्याचे भारताचे लक्ष्य!