Car Colour IQ Test: प्रत्येक गाडीचा रंग काही ना काही सांगत असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या कारचा रंगही तुमच्या बौद्धिक क्षमतेबद्दल सांगतो, जर तुम्ही आजपर्यंत हे लक्षात घेतले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, नुकतेच एका अभ्यासात हे समोर आले आहे की, कारचा रंगही वाहन मालकाच्या ‘आयक्यू’ (बुद्धिमत्ता भाग) किंवा बौद्धिक क्षमतेबद्दल बरेच काही सांगते, या संशोधनानुसार, विशिष्ट रंगांचे वाहन मालक अधिक बुद्धिमान असतात.

कारच्या रंगावरुन ओळखा तुम्ही किती स्मार्ट आहात?

जेव्हाही तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करता, तेव्हा वाहनाचे मॉडेल निवडल्यानंतर, पुढचा प्रश्न त्याच्या रंगाबद्दल मनात येतो. कारचा रंग फायनल करण्यापूर्वी, लोकांना त्यांच्या निवडीसह कुटुंबातील सदस्य आणि मित्र इत्यादींचे मत घेणे आवडते. पण गाडीचा जो रंग तुम्हाला आवडतो, तो रंग तुमच्या बुद्धिमत्तेचीही माहिती देतो. चला तर जाणून घेऊया अभ्यासात काय समोर आले.

(हे ही वाचा: Hyundai Creta, Kia Seltos चे धाबे दणाणले, देशातली सर्वात सुरक्षित SUV नव्या अवतारात दाखल, किंमत फक्त…)

अभ्यासातून काय आले समोर?

यूकेच्या स्क्रॅप कार कंपॅरिझनने केलेल्या अभ्यासानुसार, कारचा रंगही सांगतो की, तुम्ही किती स्मार्ट आहात. या संशोधनात वेगवेगळ्या रंगांच्या वाहनांच्या मालकांच्या बुद्धिमत्ता गुणांक (आयक्यू) तपासण्यात आला आणि असे आढळून आले की, पांढऱ्या रंगाची कार निवडकर्त्यांच्या IQ पातळीने सुमारे ९५.७१ स्कोअर केला जो सर्वोच्च होता. दुसरीकडे, हिरव्या रंगाच्या कार मालकांचा IQ फक्त ८८.४३ पर्यंत स्कोअर करण्यात सक्षम आहे. येथे खाली आम्ही अभ्यासात आढळलेल्या वेगवेगळ्या रंगांनुसार वाहन मालकांच्या बुद्धिमत्ता गुणांक स्कोअररबद्दल सांगत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रँक रंग सरासरी IQ

पांढरा रंग – ९५.७१
राखाडी रंग – ९४.९७
लाल रंग – ९४.८८
निळा रंग – ९३.६०
काळा रंग – ९२.८३
सिल्वर रंग – ९२.६७
हिरवा रंग – ८८.४३