उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा मध्ये उद्यापासून ऑटो एक्स्पो २०२३ होणार आहे. या शो मध्ये अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपले ब्रॅंड्सचे लाँचिंग केले आहे. यावेळी या कंपन्यांचा जास्त कल हा इलेक्ट्रिक वाहनांवर दितोय आहे. जर तुम्ही ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये जाऊ इच्छित असाल तर त्याचे तिकीट, वेळ आणि आदी बाबी जाणून घेतल्या पाहिजेत.

हेही वाचा : अग्रलेख: सुझुकींनी सुनावले

१३ जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून ऑटो एक्सपो सुरु होणार असून या पहिल्या दिवशी फक्त बिझनेस क्लास आणि माध्यमकर्मींना प्रवेश मिळणार आहे. १४ जानेवारीपासून ऑटो एक्स्पोमध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश सुरु होणार आहे. यात प्रत्येक दिवशीची वेळ ही वेगवगेळी ठेवण्यात आली आहे. १४ आणि १५ जानेवारीला याची सुरु होण्याची वेळ ११ आणि बंद होण्याची वेळ रात्री ८ ही असणार आहे. १६ आणि १७ जानेवारी रोजी अनुक्रमे ही वेळ सकाळी ११ ते रात्री ७ अशी असेल. तर, १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशी वेळ असणार आहे. जर तुम्हाला १४ ते १८ जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी ऑटो एक्सपोला भेट द्यायची असेल, तर तुम्हाला प्रवेश बंद होण्याच्या वेळेच्या १ तास अगोदर आणि कंपन्यांच्या पॅव्हेलियनमध्ये हा ३० मिनिटांपूर्वी प्रवेश बंद करण्यात येईल.

हेही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाणून घ्या तिकीट मिळण्याची जागा व तिकीटाची किंमत

ऑटो एक्स्पोचे तिकीट हे ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.बुक माय शो वर जाउन हे तिकीट खरेदी करतो येईल . १३ जानेवारी रोजी तिकीटाची किंमत ही ७५० रूपये आहे. १६ ते १८ जानेवारी दरम्यान तिकीटाची किंमत ही ३५० रूपये आहे. ऑटो एक्सपोमध्ये वीकेंडच्या दिवशी गेल्यास तिकीटाची किंमत ही ४७५ रुपये असेल. ऑटो एक्सपोला जाण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्टेटशन्स हे नॉलेज पार्क (Knowledge Park ) और जेपी ग्रीन्स (Jaypee Greens) आहेत.इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे असून त्याचे अंतर ५३ किलोमीटर इतके आहे. ऑटो एक्सपोमध्ये जाताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच पाळीव प्राणी आत नेऊ शकत नाही. निवांतपणे फिरायचे असल्यास कमीत कमी सामान आपल्यासोबत न्यावे.