scorecardresearch

Premium

कार जुनी झाल्यानंतर विकायचा Perfect Time कसा ओळखाल? जाणून घ्या सविस्तरपणे..

ठराविक कालावधीनंतर कार जुनी होते, तेव्हा तिची किंमत कमी-कमी होत जाते. तेव्हा योग्य वेळी कार विकणे आवश्यक असते.

cars
Cars (संग्रहित फोटो)

Right Time To Sell Your Old Car: प्रत्येकाला स्वत:च्या कमाईने घेतलेली गाडी प्रिय असते. पण कालांतराने विकत घेतलेली गाडी त्रास द्यायला सुरुवात करते. काही वेळेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होतो. तर कधीकधी त्यातील खराब झालेले पार्ट बाजारात उपलब्ध नसतात. अनेकदा कारची देखभाल करुनही ती खराब होते. मग पुढे तिचा वापर करणे कठीण होते. परिणामी बऱ्याचशा कार्सचे रुपांतर भंगारमध्ये होते. असे होण्यापूर्वीच काहीजण स्वत:ची Second Hand Car इतरांना विकून मोकळे होतात. जुनी कार योग्य वेळी विकल्यास बरेचसे पैसे वाचवता येतात. पण त्यासाठी योग्य Deal मिळणे आवश्यक असते.

पुढील गोष्टीवरुन तुम्ही कार विकण्यासाठीचा Perfect Time ओळखू शकता.

कारचे पार्ट्स महाग झाले आहेत किंवा बाजारात उपलब्ध नाही आहेत.

gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान

जेव्हा एखाद्या कंपनीच्या कारचे मॉडेल जुने होते, तेव्हा ती कंपनी कार आणि त्याच्या पार्ट्सची निर्मितीचे प्रमाण कमी करते. जेणेकरुन ग्राहकांनी जुन्या गाड्यांच्या जागी नव्या मॉडेल्सकडे वळतील. ज्या प्रमाणे मोबाईलचे मॉडेल जुने झाल्यावर त्याचे नवीन अपडेटेड मॉडेल बाजारात येते आणि ग्राहक त्या अपडेटेड मॉडेलकडे वळतात, तेच गाड्यांच्या बाबतीत देखील होते. ऑटोमोबाईल कंपनीच्या अशा निर्णयामुळे जुन्या कार्सचे सुटे भाग महाग होतात किंवा ते लवकर सापडत नाहीत. तुमच्याकडे असलेल्या गाडीचे पार्ट्स मिळत नसतील, तर यावरुन गाडी विकायची वेळ झाली आहे हे ठरवता येते.

कारने १,००,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले.

प्रत्येक कारची अंतर कापण्यासाठी विशिष्ट मर्यादा असते. यानुसार कार्सचे डिझाइन तयार केले जाते. जेव्हा कार हे अंतर पार करते, तेव्हा तिची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. ही कार्यक्षमता निर्माती कंपनी आणि मॉडेल यांवरही अवलंबून असते. बऱ्याच गाड्यांची क्षमता या १,००,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केल्यानंतर कमीकमी होत जाते असे म्हटले जाते. तुमच्या कारने जर हा पल्ला गाठला असेल, तर कार्यक्षमता कमी होण्याआधी ती कार Second Hand Car म्हणून विकणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

आणखी वाचा – Renault चा मोठा रेकॉर्ड; भारतात ११ वर्षांमध्ये केली तब्बल ‘एवढ्या’ लाख गाड्यांची विक्रमी विक्री

Value Depreciation Factor विचारात घ्या.

जेव्हा एखाद्या कारचे मूल्य हळूहळू कमी होत जाते तेव्हा त्या स्थितीला Value Depreciation Factor असे म्हटेल जाते. कंपनीतून कार शोरुम किंवा डिलरपर्यंत पोहचल्यावर कारची किंमत कमीकमी होत जाते. कार जितकी जुनी, तितकी तिची किंमत कमी असे आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो. त्यामुळे जर तुम्ही कार विकायचे ठरवले असेल,तर मग तुम्हाला Value Depreciation Factor विचारात घ्यावा लागेल. यामुळे तुमच्या कारचे मूल्य किती कमी झाले आहे किंवा ते किती काळ स्थिर राहू शकते याचा अंदाज येतो.

आणखी वाचा – Traffic Challan : आपल्या वाहनावर चलन प्रलंबित आहे का हे कसं तपासावं? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

कंपनीने कारच्या मॉडेलची निर्मिती करणे बंद केले आहे.

जर एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीने त्यांच्या कारचे मॉडेल बनवणे बंद केल्यास त्या मॉडेलची किंमत घसरते. अशा वेळी लवकरात लवकर कार विकणे आवश्यक असते. कारमध्ये बिघाड झाल्यावर त्यातील पार्ट्स लवकर मिळत नाहीत. शिवाय त्यावर बराच खर्च करावा लागू शकतो. कंपनीने कारची निर्मिती करणे बंद केल्यानंतर तुम्ही जितका वेळ कार स्वत:कडे ठेवाल, तितकी कारची किंमत कमी-कमी होत जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 17:50 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×