Traffic Challan : वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आपल्याला दंड भरावा लागतो. आपल्यापैकी अनेकांना या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक प्रकरणांत आपण दंड भरण्याकडे लक्ष देत नाही किंवा दंड भरायला उशीर करतो, पण यामुळे आपलं काय नुकसान होतं, याचा आपण अनेकदा विचारही करत नाही. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या. मोटार वाहन कायदा रोड सेफ्टी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. या कायद्याअंतर्गत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंड आकारला जातो. यात ओव्हर स्पीड असो किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे इत्यादी नियमांचं उल्लंघन केल्यानंतर तपासणीसाठी अनेक उपकरणांचाही वापर केला जातो. हेही वाचा : Tata Motor लवकरच भारतीय बाजारात आणणार आहेत ‘या’ ४ नव्या SUV Cars; लॉन्च होण्यापूर्वीच संपूर्ण माहिती आली समोर अशा वेळी नियम मोडणाऱ्या व्यक्तींकडून चलन कापलं जातं आणि ही माहिती त्यांना एसएमएस (SMS) द्वारेही पाठवली जाते पण चलन कापल्यानंतर जर तुम्हाला एसएमएस (SMS) द्वारे अशी कोणती माहिती आली नाही तर तुमच्या वाहनाविरोधात कोणते चलन प्रलंबित तर नाही, हे तपासणं गरजेचं आहे. ट्रॅफिक चलन भरण्यासाठी झालेला उशीर तुम्हाला महागात पडू शकतो. यामुळे तुम्हाला तुरुंगवास किंवा न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. तुमच्या वाहनाविरोधात प्रलंबित दंड आहे का, हे तपासणं आवश्यक आहे. हेही वाचा : Three Wheels In Auto: रिक्षाला तीन चाकं का असतात? जाणून घ्या यामागचं कारण कसं तपासावं? आपल्या वाहनावर चलन प्रलंबित आहे का, हे तपासण्यासाठी सुरुवातीला या लिंक वर जा आणि 'Get Challan Details'वर क्लिक करा. वाहतुकीचा registration number, chassis number आणि engine number भरा आणि दंड प्रलंबित आहे का, हे तपासा. एका पेजवर तुम्हाला वाहतुकीचा registration number, chassis number आणि engine number ची माहिती मिळणार. इनपूट आणि व्हेरिफिकेशन कोड मिळाल्यानंतर ‘Get Detail’वर क्लिक करा. पुढील पेजवर तुम्हाला ई-चलन संदर्भात संपूर्ण माहिती मिळणार. येथे तुम्ही तुमच्या वाहनावर चलन प्रलंबित आहे का तपासू शकता आणि जर प्रलंबित दंड असेल तर तुम्हाला वेळ, जागा आणि फोटो पुराव्यासह तुम्ही कोणत्या नियमाचे उल्लंघन केलं, याची संपूर्ण माहिती दिलेली असते. हेही वाचा : Norton V4CR : नॉर्टनने लॉन्च केली ‘ही’ पहिली शक्तिशाली मोटारसायकल; किंमत फक्त…, जाणून घ्या फीचर्स असा दंड भरू शकता या पोर्टलवरून तुम्ही दंडसुद्धा भरू शकता. यासाठी 'Pay Now'वर क्लिक करा आणि ऑनलाइन पैसे भरा. वेगवेगळ्या पेमेंट साइटवरून तुम्ही पैसे भरू शकता. त्यानंतर तुम्हाला दंड भरल्याची पावती मिळते.