Bajaj CT 100 only 30 thousand on bike 24 | फक्त ३० हजार रुपयात बजाजची ८९ किमी मायलेज देणारी CT100; कंपनी देतंय गॅरेंटी आणि वॉरंटी | Loksatta

फक्त ३० हजार रुपयात बजाजची ८९ किमी मायलेज देणारी CT100; कंपनी देतंय गॅरेंटी आणि वॉरंटी

टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये चांगला मायलेज असलेल्या बाइक्सची मोठी मागणी आहे.

फक्त ३० हजार रुपयात बजाजची ८९ किमी मायलेज देणारी CT100; कंपनी देतंय गॅरेंटी आणि वॉरंटी
फक्त ३० हजार रुपयात बजाजची ८९ किमी मायलेज देणारी CT100; कंपनी देतंय गॅरेंटी आणि वॉरंटी (फोटो-BIKES24)

टू-व्हीलर सेगमेंटमध्ये कमी बजेटमध्ये चांगला मायलेज असलेल्या बाइक्सची मोठी मागणी आहे. ज्यामध्ये बजाज, हिरो, सुझुकी आणि होंडा यांसारख्या कंपन्यांच्या बाइक्स आहेत. यात कमी बजेट आणि कमी वजानची बजाज CT100 बाईक लोकप्रिय आहे. मात्र ही बाईक तुम्ही शोरुममधून घेतली तर तुम्हाला ५३,६९६ रुपये खर्च करावे लागतील. पण जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल, तर आम्ही तुम्हाला ही बाईक अर्ध्या किमतीत खरेदी करण्याच्या प्लॅनची ​​संपूर्ण माहिती सांगणार आहोत, आजची ऑफर बजाज CT100 वर देण्यात आली आहे.

सेकंड हँड टू-व्हीलर खरेदी करणाऱ्या वेबसाइट BIKES24 ने बजाज CT100 लिस्ट केली आहे. त्याच्या साईटवर त्याची किंमत फक्त ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बाईकचं मॉडेल २०१५ चं आहे आणि आतापर्यंत ७२,०१८ किमी धावली आहे. या बजाज CT 100 बाईक फर्स्ट युजर असून तिची नोंदणी दिल्लीतील DL 05 RTO कार्यालयात झाली आहे. कंपनी या बजाज CT100 बाइकच्या खरेदीवर काही अटींसह 1 वर्षाची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. या मनी बॅक गॅरंटी योजनेनुसार, ही CT 100 बाईक खरेदी केल्यापासून सात दिवसांच्या आत तुम्हाला ही बाईक आवडली नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता, त्यानंतर कंपनी तुमचे पूर्ण पेमेंट तुम्हाला कोणत्याही कपातीशिवाय परत करेल.

टाटा मोटर्सच्या कमर्शिअल वाहनांच्या किंमती १ जानेवारीपासून वाढणार; जाणून घ्या

बजाज सीटी 100 वर उपलब्ध ऑफर जाणून घेतल्यानंतर बाईकचे मायलेज वैशिष्ट्य जाणून घेऊयात. बजाज CT100 मध्ये, कंपनीने १०२ सीसी इंजिन दिले आहे जे ७.९ पीएस पॉवर आणि ८.३४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससह दिले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, बाईकच्या पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे, बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बजाज सीटी 100 बाईक ८९.५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2021 at 13:36 IST
Next Story
Petrol Price Today: IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे जाहीर केले नवीन दर, आजची किंमत तपासा