मारुती सुझुकी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ग्राहकांना आकर्षक फायदे देत आहे. चांगली गोष्ट म्हणजे Fronx, Grand Vitara आणि Jimny सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर अजूनही सूट दिली जात आहे. प्रीमियम Nexa श्रेणीच्या कंपनीच्या विक्री धोरणाचा हा भाग आहे. तथापि, आम्ही तुम्हाला सांगतो की, सवलतींची श्रेणी प्रत्येक शहरानुसार बदलू शकते. तसेच ते स्टॉकवर अवलंबून असते.

मारुती सुझुकी त्याच्या स्पर्धात्मक किमतींसाठी ओळखली जाते आणि तिने तिच्या काही मॉडेल्सवर ४,००० ते १.५ लाखां रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. Ignis हे नेक्सा श्रेणीतील लोकप्रिय वाहन आहे. मार्च महिन्यात, मॅन्युअल आणि एएमटी प्रकारांवर ७९,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

(हे ही वाचा : टाटाच्या ‘या’ स्वस्त SUV वर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त… )

बलेनोवर किती सूट आहे?

Baleno बद्दल बोलायचे झाले तर Autocar India च्या रिपोर्टनुसार, त्याच्या पेट्रोल व्हेरियंटवर ४८,००० रुपयांपर्यंत आणि CNG ट्रिम्सवर ३३,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. बलेनो इग्निस प्रमाणेच १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह येते. जे ९०hp पॉवर आणि ११३Nm टॉर्क जनरेट करते.

Ciaz आणि XL6 बद्दल बोलायचे झाले तर, त्यावर अनुक्रमे ५३,००० आणि २०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ग्रँड विटारा CNG वर एकूण ४,००० रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. त्याच वेळी, ग्राहक इतर व्हेरियंटवर ५९,००० रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. ग्रँड विटारा हायब्रीडबद्दल बोलायचे झाले तर त्यावर ७९,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

१.२ लिटर पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या Fronx मॉडेल्सवर २०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच वेळी, ग्राहक १.०-लिटर टर्बो पेट्रोल प्रकारांवर ५५,००० रुपयांपर्यंतचे फायदे घेऊ शकतात. मार्च महिन्यात जिमनीवर सर्वात मोठी सूट दिली जात आहे. यावर ग्राहक १.५ लाख रुपयांपर्यंतचा एकूण लाभ घेऊ शकतात. मात्र, ही रक्कम मुंबई आणि रत्नागिरी येथील डीलरशिपद्वारे मिळवता येईल. त्याचबरोबर गोव्यात ५०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.