Best 9 Seater Cars in India: भारतात सात सीटर कारची मागणी वाढत आहे. या गाड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या मोठ्या कुटुंबांसाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाऊ शकतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही ७ सीटरच्या किमतीत ९ सीटर कार खरेदी करू शकता? महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक हे भारतातील असेच एक ९ सीटर वाहन आहे जे परवडणारे आहे आणि आकर्षक लुकसह येते. ही कार सुरक्षितता आणि शक्तिशाली इंजिनसह येते, जी तुम्हाला सुरळीत राइड देते.

‘या’ कारला ग्राहकांची पसंती

Mahindra Scorpio Classic ही भारतातील सर्वात स्वस्त ९ सीटर कार म्हणून ओळखली जाते. ही कार २०२२ मध्ये अपडेट करण्यात आली आणि स्कॉर्पिओ क्लासिक म्हणून पुन्हा लाँच करण्यात आली. ही कार फक्त S आणि S11 प्रकारात उपलब्ध आहे. त्याच्या बेस व्हेरिएंट S ची किंमत १३ लाख रुपये आहे (एक्स-शोरूम) ज्यामध्ये तुम्हाला सात आणि ९ सीटर दोन्ही पर्याय मिळतात. स्कॉर्पिओ क्लासिकचा लुकही खूप मजबूत आहे, ज्यामुळे तो आणखी आकर्षक होतो.

(हे ही वाचा : Brezza, Creta, Punch सोडून देशातील ‘या’ सर्वात स्वस्त एसयूव्हीवर जडला भारतीयांचा जीव, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा!)

बसण्याची व्यवस्था

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये २+३+४ सीटिंग लेआउट आहे. म्हणजेच पहिल्या रांगेत चालक आणि सहप्रवासी, दुसऱ्या रांगेत तीन प्रवासी आणि तिसऱ्या रांगेत ४ प्रवासी सहज बसू शकतात. शेवटच्या रांगेत बेंच सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्यावर दोन लोक बसू शकतात. ही कार व्यावसायिक वापरासाठीही योग्य आहे.

बेस मॉडेल वैशिष्ट्ये

Mahindra Scorpio Classic चे बेस व्हेरिएंट २.२-लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे जे १३२ PS पॉवर आणि ३०० Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. यामध्ये एलईडी टेल लॅम्प, सेकंड रो एसी व्हेंट्स, हायड्रॉलिक असिस्टेड बोनेट, बोनेट स्कूप, ड्युअल एअरबॅग्ज आणि मायक्रो हायब्रिड टेक यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमत

हे व्हेरिएंट ५ रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. यात गॅलेक्सी ग्रे, रेड रेज, डीएसएटी सिल्व्हर, पर्ल व्हाइट आणि नेपोली ब्लॅक या रंगाचा समावेश आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत १३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.