Best Selling SUV: कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील फेब्रुवारीतील विक्रीचा अहवाल समोर आला आहे. यावेळी यादीत टाटा नेक्सॉनचे स्थान खाली घसरले आहे. म्हणजेच या एसयूव्हीचा दबदबा कमी झाला आहे. कारण, फेब्रुवारी २०२४ मध्ये नेक्सॉन पहिल्या क्रमांकावरून घसरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर, Hyundai Creta ने सेगमेंटमध्ये दुसरा स्थान मिळवला आहे. पण, पहिल्या क्रमांकावर कोण आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर, आज आम्ही तुम्हाला फेब्रुवारी २०२४ मध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरणारी कार कोणती, याविषयी माहिती देणार आहोत.

फेब्रुवारी २०२४ मध्ये ब्रेझाच्या एकूण १५ हजार ७६५ युनिट्सची विक्री झाली. या महिन्यात क्रेटाच्या १५ हजार २७६ युनिट्सची विक्री झाली. या दोघांमध्ये ४८९ युनिट्सचा फरक होता. तर फेब्रुवारीमध्ये नेक्सॉनच्या १५ हजारांपेक्षा कमी युनिट्सची विक्री झाली. या मॉडेलला फेब्रुवारी महिन्यात १४ हजार ३९५ ग्राहक मिळाले. त्या तुलनेत जर आपण जानेवारी बद्दल बोललो तर जानेवारी २०२४ मध्ये नेक्सॉनच्या १७ हजार १८२ युनिट्स, ब्रेझाच्या १५ हजार ३०३ युनिट्स आणि क्रेटाच्या १३ हजार २१२ युनिट्सची विक्री झाली होती.

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर

(हे ही वाचा : Hyundai ची लोकप्रिय कार येतेय नव्या अवतारात; मिळतील ७० हून अधिक फीचर्स, बुकींगही सुरु, डिलिव्हरी कधी होणार?)

Maruti Brezza कारमध्ये काय आहे खास?

Maruti Brezza च्या सबकॉम्पॅट एसयुव्हीची किंमत ८.२७ लाख रुपयांपासून १४.०४ लाख रुपये इतकी आहे. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या चार ट्रीम्समध्ये ही उपलब्ध आहे. कारमध्ये सनरुफ, ३६० डिग्री कॅमेरा असे फिचर्स देण्यात आले. सुरक्षिततेसाठी, यात ६ एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर आणि चाइल्ड सेफ्टी लॉक सारखी वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळं पुन्हा एकदा याच कारकडे अनेकांचा कल वाढला. 

Brezza ला नवीन जनरेशन K-Series १.५-Dual Jet WT इंजिन मिळते. हे इंजिन स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. या इंजिनमध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन आहे. हे इंजिन १०३Bhp पॉवर आणि १३७Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या दाव्यानुसार, New Brezza चे मॅन्युअल वेरिएंट २०.१५ Kmpl चे मायलेज देते आणि ऑटोमॅटिक वेरिएंट १९.८० Kmpl मायलेज देते.