Hyundai ची Creta भारतात खूप लोकप्रिय आहे. काही काळापूर्वी कंपनीने या एसयूव्हीचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले होते. आता कंपनी ११ मार्च रोजी क्रेटा एन लाइन (Hyundai Creta N Line) भारतीय बाजारात दाखल करणार आहे. नवीन एन लाइनमध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने या कारची बुकिंगही सुरू केली आहे. 

नवीन क्रेटा एन लाइनमध्ये WRC प्रेरित डिझाइन दिसेल. स्पोर्टी लुकसोबतच तुम्हाला दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंगचा अनुभवही मिळेल. बाहेरील लूकला स्पोर्टी टच देण्यासाठी, कनेक्टेड LED DRL, स्पोर्टी अलॉय व्हील, ड्युअल एक्झॉस्ट आणि स्पोर्टी बंपरसह नवीन ग्रिल देण्यात आली आहे. नवीन क्रेटा एन-लाइनसह साऊंड, स्टीयरिंग आणि मोबिलिटीची महत्त्वाची वैशिष्ट्ये अद्ययावत करण्यात आली आहेत. नव्याने सादर होणाऱ्या या कारमधील त्याच्या केबिनमध्ये विशिष्ट फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये विविध ठिकाणी लाल स्टिचिंग आणि इन्सर्टसह स्पोर्टी ऑल-ब्लॅक थीम असेल.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

Hyundai Creta N Line ४२ मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि ७० हून अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल. यामध्ये ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल असिस्ट कंट्रोल यासह अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा : ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?   )

इंजिन आणि पॉवर

नवीन क्रेटा एन लाइन १.५-लिटर चार-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनसह ऑफर केली जाईल. हे इंजिन १६० HP पॉवर आणि २५३ Nm टॉर्क देते. ७-स्पीड DCT आणि ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स या दोन गिअरबॉक्सेससह हे बाजारात सादर केले जाईल.

ही एसयूव्ही वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये आणि N8 आणि N10 या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही २५ हजार रुपयात ही SUV कार बुक करू शकता. आता प्रश्न असा आहे की, बुकिंग केल्यानंतर, कंपनी तुम्हाला किती दिवसांत कार देईल. तर ही घरी आणण्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल. Hyundai चे म्हणणे आहे की, बुकिंग केल्यानंतर, Creta N Line ग्राहकांना सहा ते आठ आठवड्यांत वितरित केली जाईल. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या ड्रीम कारला चालवण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.