बीएमडब्ल्यू (BMW) ही अत्यंत लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. भारतामध्ये सध्या चालू असलेल्या महिन्यापासून पुढील काही महिने हा काळ सणासुदीचा काळ आहे. फेस्टिवल सिझन पाहता बीएमडब्ल्यू कंपनीने भारतात आपली 220i M परफॉर्मन्स एडिशन लॉन्च केली आहे. हे मॉडेल केवळ पेट्रोल इंजिनमध्येच लॉन्च करण्यात आले आहे. हे मॉडेल खास करून बीएमडब्ल्यू ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. २ सिरीज Gran Coupe चे एक लिमिटेड एडिशन मॉडेल एम परफॉर्मन्स व्हर्जन 220i M स्पोर्ट प्रो ट्रिमच्या तुलनेत ५० हजारांनी महाग आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या नवीन मॉडेलबद्दल अधिक जाणून घेऊयात.

अपडेटेड स्टाईल

220i M परफॉर्मन्स एडिशनमध्ये स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत काही वेगळे एलिमेंट देण्यात आला आहे. ज्यामध्ये सिग्नेचर बीएमडब्ल्यू फ्रंट किडनी ग्रील आणि सेरिअम ग्रे विंग मिररचा समावेश आहे. बीएमडब्ल्यूचे हे लिमिटेड एडिशन खास करून Sapphire ब्लॅक एक्सटेरिअर शेडसह खरेदीदारांसाठी उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा : बाइक कंपन्यांचे टेन्शन वाढले; TVS ने पाच रायडींग मोडसह लॉन्च केली ‘ही’ जबरदस्त बाइक

फीचर्स

बीएमडब्ल्यूच्या 220i M परफॉर्मन्स लिमिटेड एडिशनमध्ये ग्राहकांना स्पोर्ट सीट्स मिळतात. 220i M परफॉर्मन्समध्ये १०.२५ इंचाचे दोन डिस्प्ले मिळतात. तसेच त्यात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टिमस हे फीचर्स येतात जे बीएमडब्ल्यूच्या व्हर्च्युअल असिस्टसह लेस आहेत. अन्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले कनेक्टिव्हीटी, १० स्पीकर ऑडिओ सिस्टीम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, हेड अप डिस्प्ले आणि एक वायरलेस चार्जरचा समावेश होतो. तसेच ६ एअरबॅग्स, सर्व प्रवाशांसाठी तीन पॉईंट सीट बेल्ट, ईबीडीसह ABS, रन फ्लॅट तयार अशी अनेक सेफ्टी फीचर्स मिळतात.

इंजिन

बीएमडब्ल्यू 220i M परफॉर्मन्स एडिशन मॉडेलमध्ये २.० लिटरचे चार, चार सिलेंडरचे पेट्रोल इंजिन मिळते. जे १७६ बीएचपी पॉवर आणि २८० एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी ७-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. बीएमडब्ल्यू कंपनीने 220i M परफॉर्मन्स एडिशन हे मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. ४६ लाख (एक्सशोरूम) रुपयांच्या किंमतीत लॉन्च केली आहे.