भारतात लवकरच नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार दाखल होणार आहे. ही नवी कार ‘BYD ATTO ३’ असेल, जी बीवाईडी (बिल्ड योर ड्रीम्स) या चिनी कार उत्पादक कंपनीने बनवली आहे. पुढील महिन्यात ११ ऑक्टोबर रोजी ही कार देशात सादर होणार आहे. त्याची डिलिव्हरी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून केली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावर आणि स्पीड

BYD ATTO ३ मध्ये परमनंट मैगनेट सिंक्रोनस मोटर वापरली जाईल. ही मोटर २०१ bhp ची मैक्सिमम पॉवर आणि ३१० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करू शकते. ही कार केवळ ७.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम आहे.

(आणखी वाचा : नवरात्रीमध्ये ‘या’ गाड्यांवर मिळणार मोठी सुट; बचत होईल ५४ हजार रुपयांची, जाणून घ्या ऑफर )

कारची फीचर्स

BYD ATTO 3 इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, Android Auto आणि Apple CarPlay साठी सपोर्ट, LED लाइटिंग सिस्टीम, १२.८-इंच रोटेटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि हीटेड सीट्स यासह इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असेल.

दुसरीकडे, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), हिल डिसेंट कंट्रोल (HDC), सात एअरबॅग्ज, ADAS, ३६०-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) ही सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून दिली जातील. या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये ४९.९२ kwh क्षमतेचा ब्लेड बॅटरी पॅक मिळू शकतो. ही कार ३४५ किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच, यात ६०.४९ kwh ची मोठी बॅटरी लोड केली जाऊ शकते, जी ४२० किमीची रेंज देण्यास सक्षम असेल.

किंमत

या नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत ३० लाख ते ३५ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही कार देशातील MG ZS EV SE शी स्पर्धा करेल. कंपनीने काही काळापूर्वी भारतात आपले पहिले शोरूम दिल्ली मध्ये उघडले होते. तर नोएडा आणि मुंबईतील कंपनी आगामी काळात विस्तारू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byd atto 3 electric suv will be launched on this day pdb
First published on: 23-09-2022 at 12:49 IST