चीनची कंपनी बीवायडीने आज ११ ऑक्टोबरला भारतीय बाजारात आपली पहिली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव ‘BYD Atto3’ असून कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर कारचे टीझर व्हिडीओ प्रसिद्ध केले आहे. कंपनीच्या नवीन ईव्हीची डिलिव्हरी २०२३ च्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या इलेक्ट्रिक कारमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ऑटोनोमस इमरजेंसी ब्रेकिंग, लेन असिस्टंट, डिपार्चर वॉर्निंग, फ्रंट आणि रियर कॉलिजन वॉर्निंग, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि रियर क्रॉस ट्रॅफिक ब्रेकिंग देखील असेल. त्याचबरोबर कारमधील फीचर्स कंट्रोल करण्यासाठी कंपनी या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये १२.८ इंचाची टचस्क्रीन देईल.

आणखी वाचा : Exalta कंपनीने बाजारपेठेत लाँच केल्या ‘या’ चार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत…

फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

BYD Atto 3 मध्ये २०१bhp आणि ३१०Nm इलेक्ट्रिक मोटरसह ६०.५kWh बॅटरी पॅकची फायरपावर देण्यात येईल. Atto 3 एकदा चार्ज केल्यावर ४८०km ची रेंज देईल, असा दावा करण्यात आला आहे. ही आगामी कार ६.६kW AC चार्जरच्या माध्यमातून ९.५ तासांमध्ये फुल चार्ज करता येईल, असं सांगण्यात आलं आहे. या ईव्ही एसयूव्ही मध्ये एलईडी हेडलॅम्प, १२.८ इंचाची रोटेटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पाच इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पावर्ड फ्रंट सीट, वायरलेस चार्जर, अ‍ॅम्बिएंट लाइटिंग, ३६० डिग्री कॅमेरा आणि सात एयरबॅग असतील.

बुकिंग

बीवायडीने Atto3 नावाची पहिली इलेक्ट्रिक SUV सादर केली असून अंदाजे ५०,००० रुपयांमध्ये Atto3 EV चे बुकिंग देखील सुरु केले आहे.