Car Protection Tips: कार अपघाताला अनेकदा आपणच जबाबदार ठरू शकतो. नवीन कार आली की, ती अगदी नीटनेटकी ठेवून तिची काळजी घेतली जाते. पण, जशी कार हळूहळू जुनी होते, तसे मग आपण गाडीत काहीही वस्तू ठेवू लागतो. कारमध्ये अनेकदा काही ना काही गोष्टी ठेवायची सवय सगळ्यांनाच असते. पण, तुमची ही एक छोटीशीही चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुमच्या गाडीचे नुकसान होऊ शकते आणि गंभीर परिस्थितीही ओढवू शकते.

तसंच कारच्या डिकीमध्ये (boot) काही गोष्टी ठेवणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कारमध्ये स्फोट होण्याचा धोका आहे. जर तुम्हीही या गोष्टी कारमध्ये ठेवत असाल, तर आजच काळजी घेणे आवश्यक आहे.

चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या गोष्टी कारच्या डिकीत ठेवणे पडेल महागात…

१. ज्वलनशील पदार्थ

का ठेवू नये : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, पेंट, थिनर आदी ज्वलनशील पदार्थ गाडीच्या आत ठेवल्याने आगीचा धोका असतो. उन्हाळ्यात कारच्या आतील तापमानात लक्षणीय वाढ होते आणि त्यामुळे ज्वलनशील पदार्थांना आग लागू शकते.

२. एरोसॉल कॅन

एरोसॉल कॅन्समध्ये दबाव असतो. जर उन्हाळ्यात एरोसॉल गाडीत ठेवले, तर दाब वाढून ते कॅन्स फुटू शकतात.

३. बॅटरी

कारच्या बॅटरीमध्ये अ‍ॅसिड असते. बॅटरी लीक झाल्यास कारला आतून गंज चढू शकतो. त्याशिवाय शॉर्टसर्किटचा धोकाही असतो.

४. खाद्यपदार्थ

उन्हाळ्यात कारच्या आतील तापमानात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे अन्नपदार्थ खराब होऊन दुर्गंधी येऊ लागते.

५. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कारमध्ये ठेवल्यास नुकसान होऊ शकते. उष्णतेमुळे त्यांच्या बॅटरी फुगू शकतात किंवा खराब होऊ शकतात.