Car Care Tips: सध्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, अनेक भागांत रेड, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवसांत जर तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल; अन्यथा तुमच्या लाखो रुपयांच्या गाडीचे नुकसान होऊ शकते. पावसाळ्यात अनेकदा गाडीत पाणी शिरते. अशा परिस्थितीत पुढे काय करायचे यासंबंधी योग्य ती माहिती अनेकांना नसते. त्यामुळे आता काय करायचे या विचाराने ते घाबरून जातात आणि मग अधिक खर्च करून गाडी दुरुस्त करून घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय सुचत नाही. पण मंडळी, अशा वेळी तुम्हाला घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. आम्ही दिलेल्या खालील काही टिप्स तुम्ही फॉलो केल्यात, तर पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या गाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही.

पावसात कारची अशी घ्या काळजी (Car Care Tips)

पाणी तुंबलेल्या रस्त्यावर गाडी नेणे टाळा

जर तुमच्याकडे हॅचबॅक किंवा सेडान कार असेल, तर शक्यतो पाणी साठलेल्या ठिकाणी कारने प्रवास करणे टाळा. कारण- या गाडीत पाणी शिरू शकते. तुमच्याकडे जरी ‘एसयूव्ही’ असली तरी ही गाडी फक्त एका पातळीपर्यंत पाणी आत येऊ देत नाही. त्यानंतर मात्र त्यात पाणी जाते. अशा परिस्थितीत पाणी तुंबलेल्या रस्त्यावर गाडी न नेणे हाच उत्तम पर्याय आहे.

कोरड्या जागी गाडी थांबवा

रस्त्यावर पावसाचे पाणी वाढू लागल्यास कार कोरड्या जागी थांबवा आणि गाडीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करा. या कामात अजिबात उशीर करू नका. त्याशिवाय तुम्हाला जवळपास कोणी कार मेकॅनिक किंवा गॅरेज आढळल्यास तिथे कार घेऊन जा; जेणेकरून गाडीची चांगल्या प्रकारे तपासणी करता येईल.

कारमधील पाणी काढून टाका

जर तुमची कार पाण्यात अडकली असेल, तर ताबडतोब कारचे इंजिन थांबवा आणि कारमधून बाहेर या आणि नंतर कार पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. पाण्याची पातळी जास्त असल्यास प्रसंगी टोईंगची मदत घ्या. गाडीत पाणी गेल्यावर आत किती पाणी गेले आहे हे तपासा आणि गाडीच्या मॅटपर्यंत पाणी पोहोचले असेल, तर गाडीचे सर्व दरवाजे उघडा. अशा स्थितीत मॅट कापडाने स्वच्छ करा. पाण्याची पातळी सीट्सपर्यंत असल्यास, सर्व सीट्स उघडून काढून टाका; जेणेकरून पाणी लवकर बाहेर पडेल.

हेही वाचा: बाईक मेंटेनन्सच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींकडे कधीही करू नका दुर्लक्ष

इलेक्ट्रिक पार्ट्स तपासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर पावसाचे जास्त पाणी कारमध्ये शिरले असेल, तर कारचे सर्व इलेक्ट्रिक पार्ट्स नीट काम करीत आहेत की नाही याची पडताळणी करा. यादरम्यान कारचे बॅटरी कनेक्शन बंद करा; जेणेकरून बॅटरी खराब होणार नाही.