Pakistan’s big car disaster: पाकिस्तान काही दिवसांपासून कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस आणखी बिघडली जात आहे. पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत आहे. महागाईने रेकॉर्डब्रेक केले आहे. पाकिस्तानात सर्वसामान्यांना जगणं कठीण बनले आहे. पाकिस्तानींसाठी कार खरेदी करणे कठीण झाले आहे. तेथील वाहनांचा बाजारही थंडावला आहे.

पाकिस्तानमध्ये कारच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये देशात केवळ ६,२०० कार विकल्या गेल्या, यावरून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खराब स्थिती दिसून येते. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर पाकिस्तानमधील कार विक्रीत २६ टक्क्यांनी घट झाली आहे. पाकिस्तान ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (PAMA) यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, संपूर्ण देशात ऑक्टोबर २०२३ मध्ये कारची विक्री केवळ ६,२०० युनिट्सवर आली, जी सप्टेंबरमध्ये विक्री झालेल्या ८,४०० युनिट्सपेक्षा कमी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर PAMA नसलेल्या सदस्यांच्या विक्रीच्या आकडेवारीचाही समावेश केला तर ऑक्टोबरमध्ये एकूण ७,००० कार विकल्या गेल्या, जे सप्टेंबरमध्ये विकल्या गेलेल्या ९,५०० युनिट्सपेक्षा खूपच कमी आहे. त्याच वेळी, जर आपण गेल्या वर्षी (२०२२) ऑक्टोबर महिन्यात पाहिले तर पाकिस्तानमध्ये १५,००० कार विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच, वार्षिक आणि महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर विक्रीत मोठी घट झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तिथली ढासळलेली अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकटाचा मोठा फटका तिथल्या वाहन उद्योगाला बसला आहे.

(हे ही वाचा : Hyundai ची उडाली झोप! ६ एअरबॅग्जवाल्या ५ सीटर इलेक्ट्रिक SUV ची मागणी बाजारात थंडावली; विक्रीत घसरण  )

पाकिस्तान ऑटोमोबाईल उद्योगाला गेल्या काही काळापासून मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कारच्या मागणीत मोठी घट झाली असताना, पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाल्यामुळे उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय, आयात बिल कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने ऑटोमोबाईल उद्योगात वापरल्या जाणार्‍या काही भागांच्या आयातीवरील शुल्कातही वाढ केली होती, परिणामी कारच्या किमती वाढल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी बाजारपेठेतील प्रमुख कार उत्पादकांमध्ये Atlas Honda, Pan Suzuki, Toyota, Hyundai आणि Kia यांचा समावेश आहे. अलिकडच्या काळात येथे अनेक कार उत्पादन युनिट्स देखील बंद झाली आहेत. अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या चार महिन्यांत पाकिस्तानमध्ये केवळ २७,१६३ कार विक्रीची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विकल्या गेलेल्या ४८,४७३ युनिटच्या तुलनेत हे प्रमाण ४४ टक्क्यांनी कमी आहे.