सध्या आपल्या देशात नवीन एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. कमी किमतीमध्ये भन्नाट मायलेज आणि बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या एसयूव्ही कार खरेदीसाठी बाजारात ग्राहक प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. Tata Nexon, Hyundai Creta, Kia Seltos सारख्या कारने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. ऑगस्ट २०२३ च्या कार विक्रीने पुष्टी केली की, देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीच्या कारशी स्पर्धा करण्यासाठी बाजारात कोणीही नाही. टॉप १० विकल्या जाणार्‍या कार्स असो किंवा टॉप ५ SUV, दोन्ही श्रेणींमध्ये मारुती कारनं आपला ठसा उमटवला आहे.

या वर्षी लाँच झालेल्या मारुती सुझुकीच्या आणखी एका कारनं बाजारपेठेत आपला डंका वाजवला आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान, मायलेज आणि वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झालेल्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला टक्कर देण्याची ताकद कोणातच नाही. परिस्थिती अशी आहे की लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच या कारने टॉप ५ बेस्ट सेलिंग एसयूव्हीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

(हे ही वाचा : Hero ची उडाली झोप, Honda ची नवी बाईक देशात दाखल, किंमत फक्त…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी ग्रँड विटारा बद्दल सांगत आहोत. मारुतीने आपली नवीन एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत नुकतीच लाँच केली आहे. ग्रँड विटारा ही कंपनीची प्रीमियम एसयूव्ही आहे. यामध्ये कंपनीने अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. या कारची किंमत ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ठेवण्यात आली आहे. या कारची किंमत १०.७० लाख रुपये आहे. या कारला लाँच झाल्यापासून आतापर्यंत बंपर बुकींग मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यातच कंपनीकडे २७ हजार बुकिंग पेडींग आहेत. ग्रँड विटारा बुक केल्यानंतर, या कारसाठी ग्राहकांना सहा ते सात महिने प्रतीक्षा करावी लागेल. सातत्यपूर्ण बुकिंग लक्षात घेता ही वेळही वाढू शकते.

सध्या, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही सर्वात जास्त मायलेज देणारी कार आहे आणि तिचे मायलेज ३० किलोमीटर प्रति लिटरपर्यंत येते.