भारतात सेकंड हँड वाहनांची विक्री वाढत आहे. कार, बाईकच्या किंमतींमध्ये वृद्धी झाल्याने अनेकांना ती परवडत नाही, परिणामी ग्राहक नवे वाहन घेण्याऐवजी वापरलेले वाहन घेतात. मात्र असे वाहन घेतल्यानंतर त्यात बिघाड झाल्याच्या देखील तक्रारी होतात. यात ग्राहकांना नुकसान होते. त्यामुळे सेकंड हँड वाहन घेताना ती तपासूनच घेतली पाहिजे. सेकंड हँड बाईक घेताना पुढील खबरदारी घेतल्यास नुकसान टळू शकते.

१) बाईकचे सर्व्हिस रेकॉर्ड चेक करा

सेकंड हँड बाईक घेताना डोळे मिटून घेऊ नका. आधी त्या बाईकची स्थिती काय आहे ती जाणून घ्या. यासाठी बाईकचे सर्व्हिस रेकॉर्ड चेक करा. त्यात काही गडबड दिसल्यास बाईकची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा इतर पर्याय शोधा. सर्व्हिस रेकॉर्ड न बघता बाईक घेतल्यास पुढे तिच्यामध्ये बिघाड निघाल्यास तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते.

(‘या’ आहेत जगातील सर्वात वेगवान कार्स, लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात)

२) बाईकचा विमा आणि अपघाताच इतिहास तपासा

जुनी बाईक घेताना तिचा पूर्वी अपघात झाला होता की नाही, हे तपासा. अपघात झाल्यावर बाईकच्या महत्वाच्या भागांना नुकसान होण्याची शक्यता असते. जर असे झाले असेल तर तशी बाईक घेऊ नका. तसेच बाईकचा विमा देखील तपासा.

३) बाईकचे कागदपत्र तपासा

सेकेंड हँड बाईक घेताना तिचे कागदपत्र तपासले पाहिजेत. बाईकच्या मालकाचे नाव, त्याचा पत्ता, बाईकचा विमा, बाईक कर्जावर तर घेतलेली नाही ना, तसेच तिचा गुन्हेगारी प्रकरणात समावेश तर नाही ना, त्याचबरोबर प्रदूषण प्रमाणपत्र हे तपासूनच तिला घ्या.

(मुंबईत इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचा स्फोट, बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ करा)

४) बाईकचे इंजिन

सेकेंड हँड बाईक घेताना तिचे इंजिन तपासलेच पाहिजे. इंजिन हा बाईकचा सर्वात महत्वाचा भाग आहे. इंजिनमधून ऑइल लिक होणे किंवा त्यातून धूर तर निघत नाहीये ना हे तपासा. इंजिनची तपासणी, तसेच बाईक चालवल्यानंतरच ती घेण्याचा विचार करा.

५) बाईक मेकॅनिककडून तपासून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेकेंड हँड बाईक घेण्यासाठी घाई न करता आधी मेकॅनिककडून तिची तपासणी करून घ्या. मेकॅनिकला बाईक चालवू द्या. याने तुम्हाला बाईकबद्दल अधिक माहिती तो देऊ शकेल.