Deactivate fast tag before selling : पूर्वी टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर मोठी गर्दी व्हायची. मात्र आता फास्टॅगमुळे ही गर्दी कमी झाली आहे. फास्टॅग हे स्टिकर स्वरुपात मिळत असून ते वाहनावर विशेष ठिकाणी चिपकवले जाते. वाहनाला फास्टॅग असल्यास टोल लवकर भरल्या जाते. टोलवर फास्टॅग स्कॅन झाल्यानंतर थेट तुमच्या खात्यातून टोलसाठी पैसे कटतात. तुम्ही जर वाहन विकत असाल तर त्या आधी फास्टॅग बंद करण्याचे विसरू नका.

फास्टॅग का बंद करावे?

फास्टॅग अधिकृत जारीकर्ता किंवा बँकांकडून मिळते. तुमच्या बँक खात्याशी फास्टॅग जुळलेले असते. जर तुम्ही आपली कार विकली आणि फास्टॅग बंद केले नाही तर नवीन खरेदीदार तुमच्या फास्टॅगचे फायदे घेऊ शकतो. नवीन खरेदीदार तुमच्या फास्टॅगने पेमेंट करू शकतो. यासाठी तुमच्या खात्यातील पैसे कापले जातील. म्हणून कार विकण्यापूर्वी फास्टॅग खाते बंद करणे गरजेचे आहे. तसेच, जोपर्यंत तुम्ही आपले फास्टॅग बंद करत नाही, तो पर्यंत नवीन खरेदीदाराल फास्टॅगसाठी अर्ज करता येणार नाही.

(आनंदाची बातमी! केवळ ४ लाखांमध्ये मिळत आहे MAHINDRA THAR, जाणून घ्या ऑफर)

फास्टॅग खाते असे करा बंद

  • भारत सरकारचे हेल्पलाइन क्रमांका १०३३ वर कॉल करून तुम्ही फास्टॅग संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करू शकता. त्याचबरोबर, तुमच्या सर्व्हिस प्रोव्हाइडरच्या कस्टमर केयर क्रमांकावर कॉल करून तुम्ही फास्टॅग बंद करू शकता.
  • एनएचएआय (आयएचएमसीएल) – १०३३ वर कॉल करा. येथे तुम्हाला फास्टॅग बंद करण्याचा प्रक्रियेविषयी माहिती मिळेल.
  • आयसीआयसीआय बँक – १८००२१००१०४ वर कॉल करा. या क्रमांकावर तुम्हाला फास्टॅग बंद करण्याच्या प्रक्रियेविषयी सांगितले जाईल.
  • पेटीएम – १८००१२०४२१० वर कॉल करून तुम्ही खाते बंद करू शकता.
  • अ‍ॅक्सिस बँक – १८००४१९८५८५ वर कॉल करून तुम्ही खाते बंद करू शकता.
  • एचडीएफसी बँक – १८००१२०१२४३ वर कॉल करा. येथे तुम्हाला फास्टॅग बंद करण्याच्या प्रक्रियेबाबत सांगितल्या जाईल.
  • एअरटेल पेमेंट बँक – खाते बंद करण्यासाठी ८८००६८८००६ या क्रमांकावर कॉल करा. येथे तुम्हाला फास्टॅग बंद करण्याच्या प्रक्रियेबाबत सांगितले जाईल.