Maruti Grand Vitara Booking: नुकत्याच सादर करण्यात आलेल्या मध्यम आकाराच्या मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्हीला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने जुलै महिन्यापासूनच या कारसाठी बुकिंग्स घेण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत या कारला ८८,००० बुकिंग्स मिळाल्या असून यापैकी ५५ हजार ५०० ऑर्डर्स पेडिंग आहेत. कंपनीचे प्रोडक्शन टार्गेट या आर्थिक वर्षात २० लाख यूनिट्सने कमी राहिले आहे. सध्या मारुतीकडे ३.७५ लाख यूनिट्सच्या ऑर्डर पेंडिंग आहेत, असा खुलासा कंपनीने केला आहे.

Maruti Grand Vitara फीचर्स

आगामी ग्रँड विटारा मारुती सुझुकीचे भारतातील पहिले मजबूत हायब्रिड वाहन आहे. ग्रँड विटारा दोन इंजिन पर्यायांसह आहे. यात ई-सीव्हीटीसह मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह नवीन १.५-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. दुसरे १.५-लिटर माइल्ड-हायब्रिड पेट्रोल इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ६-स्पीड एटीशी जोडलेले आहे. ग्रँड विटाराच्या माइल्ड-हायब्रिड मॅन्युअल प्रकारात AWD देखील उपलब्ध असेल. कंपनी हायब्रिड प्रकारात २७.९७ kmpl च्या मायलेजचा दावा करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(आणखी वाचा : Tata Motors December 2022 discounts: ‘या’ कारवर मिळतेय दमदार सूट; होणार ६५ हजारांची बचत )

Maruti Grand Vitara किंमत

मारुती ग्रँड विटारा एसयूव्ही मॉडेल चार ट्रिम्स- सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फासह एकूण ११ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या माइल्ड हायब्रिड मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत १०.४५ लाख रुपयांपासून १६.८९ लाख रुपयांदरम्यान आहे.