इलेक्ट्रिक स्कूटरची भारतीय बाजारात मागणी वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) बाजारपेठ वेगाने वाढत आहे. वाहन उत्पादक कंपन्या आपल्या कंपनीचे बेस्ट इलेक्ट्रिक मॉडेल बाजारामध्ये सादर करत आहेत. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण देशातील बाजारात आणखी एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर दाखल केली आहे. या स्कूटरला कंपनीने हटके फीचर्ससह दाखल केलं आहे. जाणून घ्या या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरविषयी सविस्तर…

Fujiyama EV Classic e-Scooter भारतात लाँच करण्यात आली आहे. यामध्ये रायडर्सना जबरदस्त रेंज आणि चांगला टॉप स्पीड मिळेल. आधुनिक रायडर्सच्या गरजेनुसार हे लाँच करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर फीचर्स आणि चांगल्या परफॉर्मन्सने सुसज्ज असल्याचा दावा कंपनीचा आहे.

sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर

(हे ही वाचा : बलेनो नव्हे तर देशातील बाजारपेठेत ‘या’ स्वस्त हॅचबॅक कारसाठी शोरूमवर होतेय मोठी गर्दी, ठरली नंबर वन कार)

ही स्कूटर ३ हजार-वॅट पीक पॉवर मोटरसह लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ६० किमी/तास आहे. त्याचवेळी, ते एका चार्जवर १२० किलोमीटरपर्यंत चालवता येते. याचा अर्थ असा आहे की, या संयोजनामुळे, राइडर्स चार्जिंगची चिंता न करता शहरात दीर्घकाळ आरामात फिरू शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तास लागतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये CAN कनेक्टिव्हिटीसह डिजिटल स्पीडोमीटर आहे. यामध्ये ग्राहकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित सर्व फीचर्स आहेत.

रात्रीच्या वेळी चांगल्या दृश्यमानतेसाठी यात ट्विन-बॅरल एलईडी दिवे आहेत. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर यात कॉम्बी-ड्रम ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रायडर्सना डिजिटल स्पीडोमीटरही मिळेल. Fujiyama EV Classic मध्ये मोठे १२-इंच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर हलकी आहे, ज्याच्या मागील चाकामध्ये एक पॉवरफूल हब मोटर स्थापित केली आहे. 

Fujiyama EV Classic ची एक्स-शोरूम किंमत ७९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्हाला जर इलेक्ट्रिक स्कूटरला बुक करायचे असेल तर तुम्ही १ हजार ९९९ रुपये भरून स्कूटर बुक करु शकता.