सध्या सर्व गोष्टींवर फेस्टिव सेलमध्ये मोठी सूट देण्यात येत आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मवर सर्वात मोठी सूट देण्यात येणार, याची जणू स्पर्धा सुरू आहे. गाड्या देखील या स्पर्धेमध्ये मागे नाहीत. अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर सूट देण्यात येत आहे. मारुती सुझुकीने देखील या फेस्टिव ऑफर्समध्ये सहभाग घेत काही गाड्यांवर २५ हजार ते ५९ हजार इतका मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये पाच लोकप्रिय फ्लॅगशिप मॉडेल्सचा समावेश आहे.

मारुती सुझुकीच्या या गाडयांवर मिळतेय सूट

आणखी वाचा : ‘ग्रँड विटारा’नंतर टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

ऑल्टो के १०
ऑल्टो के १० देशातील सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. ही कार महिनाभरापूर्वी लाँच झाली आहे. आता कंपनी या कारवर २५ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. अल्टो के १० ची एक्स-शोरूम किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

ऑल्टो ८००
ऑल्टो ८०० या कारवर २९ हजारांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. यावर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेगन आर
वेगन आर या फ्लॅगशिप कारची विक्री कमी झाली आहे, त्यामुळे विक्री पुन्हा वाढवण्यासाठी मारुती सुझुकीने या कारवर मोठी सवलत जाहीर केली आहे. या कारवर ४० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

Car Tips : कार नेहमी नव्यासारखी राहावी यासाठी वापरा ‘या’ टिप्स

सिलेरीयो
सिलेरीयो या कारवर ५९ हजारांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. यावर कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बोनस या ऑफर उपलब्ध आहेत.

एसप्रेसो
काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या एसप्रेसो कारवर ५९ हजारांची सूट जाहीर करण्यात आली आहे.