scorecardresearch

‘या’ आहेत सुझुकीच्या लोकप्रिय बाईक्स व स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स

सणांच्या शुभमुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय स्कुटर आणि बाईक कोणत्या आहेत जाणून घ्या.

‘या’ आहेत सुझुकीच्या लोकप्रिय बाईक्स व स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स
(Source: Suzuki India)

Suzuki Best Bikes And Scooter : दुचाकी वाहनांमध्ये सुझुकी हा भारतातील लोकप्रिय ब्रँड आहे. सुझुकीने स्कूटरसह बजेट स्पोर्ट्स बाईक आणि प्रीमियम सुपरबाइक श्रेणीमध्ये एकापेक्षा जास्त प्रोडक्ट लॉन्च केले आहेत. जिक्सर सीरिजमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असताना, ग्राहक नुकत्याच लाँच झालेल्या कटारा तसेच हायाबुसासारख्या महागड्या बाइक्सना प्राधान्य देत आहेत. इंट्रूडर आणि व्ही-स्ट्रॉम सारख्या बाइक्सचीही त्यांच्या सेगमेंटमध्ये चांगली विक्री होत आहे. या सगळ्यामध्ये एवेनिस १२५, ऍक्सेस १२५ आणि बर्गमन स्ट्रीट सारख्या स्कूटर देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. जर तुम्हीही दसरा, दिवाळी या सणांच्या काळात नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय बाईक आणि स्कुटरची यादी पाहा.

सुझुकी कंपनीच्या आकर्षक स्कूटर

  • सुझुकीच्या लोकप्रिय स्कूटरमध्ये बोलायचे ऍक्सेस १२५ चा समावेश होतो.
  • या स्कूटरची किंमत ७७,६०० ते ८७,२०० रुपयांपर्यंत आहे. ऍक्सेस १२५ चे मायलेज ५२.४५ केएमपीएलपर्यंत आहे. यासह सुझुकी अव्हेनीस १२५ ही लोकप्रिय स्कूटर आहे.
  • याची किंमत ८७,५०० ते ८९,३०० रुपयांपर्यंत आहे.
  • सुझुकी बर्गमन ही सुझुकीची आणखी एक लोकप्रिय स्कूटर आहे.
  • याची किंमत ८९,९०० रुपये ते ९३,३०० रुपये आहे.
  • बर्गमन स्ट्रीट मायलेज ५५.८९ केएमपीएल पर्यंत आहे. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.

आणखी वाचा : नवीन कार घेण्याचा विचार करताय? मारुती सुझुकीच्या ‘या’ तीन गाड्यांची होतेय सर्वाधिक विक्री; जाणून घ्या फीचर्स

सुझुकीच्या लोकप्रिय बाईक्स

  • सुझुकीच्या जिक्सर, जिक्सर एसएफ, वी स्ट्रोम एसएक्स या काही लोकप्रिय बाईक्स आहेत.
  • सुझुकी जिक्सरची किंमत १.३५ लाख रुपये आहे.
  • तर सुझुकी जिक्सर एसएफची किंमत १.३७ लाख रुपये आहे. सुझुकी जिक्सर एसएफ २५० ची किंमत १.९२ लाख ते १.९३ लाख रुपये आहे.
  • सुझुकी जिक्सर २५० ची किंमत १.८१ लाख रुपये आहे. सुझुकी वी-स्ट्रोम एसएक्सची किंमत २.१२ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या