Sedan Car Segment या ऑटो मोबाईल क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय अशा गाड्या म्हणून ओळखल्या जातात. मध्यम ते उच्च रेंज पर्यंतच्या किंमतीच्या प्रीमियम सेडन कार या भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने एक सोयीस्कर व स्वस्त पर्याय ठरतो. या कारचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात मोठ्या कुटुंबासाठी आवश्यक केबिन स्पेस, लेग स्पेस व लांबच्या प्रवासासाठी साजेसे असे उत्तम मायलेज मिळते, यामुळेच या गाड्यांचे बुकिंग नेहमीच अधिक असते. याच सेडन सिग्माएंटमधील एक लोकप्रिय कार म्हणजे होंडा अमेझ. वर्षानुवर्षे होंडाने भारतीय ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. होंडाच्या गाड्यांची विशेष बाब म्हणजे कमी किंमतीत तुम्हाला महागडा लुक असलेली गाडी घरी आणता येते. अशाच होंडा अमेझचा अवघ्या ७० हजारापासून सुरु होणारा एक फायनान्स प्लॅन आज आपण जाणून घेणार आहोत.

Honda Amaze मूळ किंमत

होंडा कारच्या अमेझ सेडान बेस मॉडेलची सुरुवाती किंमत ही ६ लाख, ६२ हजार ५९९ रुपये इतकी आहे. ऑन रोड हीच किंमत ७ लाख ५१ हजार ३६४ पर्यंत वाढते. म्हणजे साधारणपणे तुम्ही होंडा अमेझ सेडान घेणार असाल तर साडे सात लाख रुपये गुंतवण्याची तयारी ठेवावी लागते. पण जर तुम्हाला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करायची असेल तर तुम्ही हा फायनान्स प्लॅन विचारात घेऊ शकता.

Honda Amaze ७० हजारात कशी मिळवाल?

ऑनलाईन फायनान्स प्लॅननुसार डाऊन पेमेंट व मासिक हफ्त्यांची आकडेमोड केल्यास आपल्याला होंडाची अमेझ सेडान अवघ्या ७० हजारात आपली दारी आणता येऊ शकते. समजा जर तुम्ही कार खरेदी साठी बॅंकेचे कर्ज काढणार असाल तर आपल्याला जवळपास क्रेडिट नुसार ६ लाख ८१ हजार ३६४ रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, ज्यावर ९.८% प्रतिवर्ष व्याजदर लागू असतो. यावेळी आपल्याला फक्त ७० हजाराचे डाऊन पेमेंट करायचे आहे ज्या नंतर प्रत्येक महिन्यात १४ हजार ४१० रुपयांचा हफ्ता भरून आपण ५ वर्षात कारसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Honda Amaze इंजिन क्षमता व फीचर्स

होंडा अमेज मध्ये कम्पनितर्डे ११९९ सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे, ज्यात ८८. ५० बीएचपी पॉवर व ११० एनएमचा पीक स्टार्ट जनरेट होऊ शकतो. या इंजिनसह होंडाने स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनही गाडीत जोडलेले आहे. होंडा अमेझचे मायलेज हे ARAI तर्फे प्रमाणित करण्यात आले आहे ज्यानुसार ही गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये १८. ६ किलोमीटर धावू शकते