गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स एक्सटेन्शन रोडवर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक महागडी स्पोर्ट्स कार भरदाव वेगाने जात होती, तेव्हा ही कार आधी डिव्हायडरला धडकली त्यानंतर एका झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर काही क्षणात कार जळून खाक झाली. सुदैवाने या भीषण अपघातानंतरही कारचा चालक आणि एक सहप्रवासी दोघेही बचावले. चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आग विझवली. परंतु त्याआधीच तब्बल दोन कोटी रुपयांची कार जळून खाक झाली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर माहिती मिळाली की, ही आलिशान पोर्श कार चंदीगडमध्ये रजिस्टर्ड आहेत. पहाटे चार वाजता हा अपघात झाला. कार गोल्फ कोर्सजवळ आल्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार डिव्हायडरला धडकली, त्यानंतरही ही कार थांबली नाही. कार त्यानंतर एका झाडावर आदळली.

या अपघातानंतर कारने पेट घेतला. परंतु त्याआधीच कारमधील दोन तरूण (चालक आणि सहप्रवासी) कारमधून बाहेर पडले. त्यामुळे दोघेही बचावले. या अपघातामुळे कारमधील चालक आणि सहप्रवाशाला दुखापत झाली आहे. परंतु कारने पेट घेण्यापूर्वी दोघेही कारमधून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हे ही वाचा >> मारुतीच्या ‘या’ स्वस्त कारची विक्री घसरली, ३० दिवसात फक्त ‘इतक्या’ गाड्या विकल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर त्यांनी ही आग विझवली. परंतु त्याआधीच ही कार जळून खाक झाली होती. पोलीस आता या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, या कारचा चालक, मनकिरत सिंह (३५) याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी भाजलं आहे. सेक्टर ३८ मधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.