हिरो इलेक्ट्रिक स्कूटरची सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. कंपनीने १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान २४,००० स्कूटर विकल्या, असं हिरो इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या रिटेल विक्रीचा आकडा गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत दुप्पट आहे. म्हणजेच सणासुदीच्या काळात हिरो इलेक्ट्रिकची विक्री दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ११,३३९ स्कूटर विकल्या होत्या, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कंपनीने म्हटले आहे की, FAME II (फास्टर अ‍ॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेहिकल्स इन इंडिया) धोरणातील अलीकडील सुधारणांमुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. या धोरणांतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय इंधनाच्या वाढत्या किमतींमुळेही इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.

Tesla Cybertruck: लॉन्चिंगपूर्वीच १३ लाख युनिट्सची बुकींग; पूर्ण चार्जिंगमध्ये धावते ९५० किमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सोहिंदर गिल म्हणाले, “या हंगामात आम्हाला आमच्या शोरूममध्ये दोन बाबी पाहायला मिळाल्या. मोठ्या संख्येने ग्राहक पेट्रोल बाईकपेक्षा हिरो ई-बाईकला प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाचा विचार करून आणि त्यांच्या टिकाऊ क्षमतेमुळे मोठ्या संख्येने ग्राहक शा बाइक्स खरेदी करत आहेत. या माध्यमातून वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.” दुसरीकडे, कंपनी आपलं इलेक्ट्रिक वाहन २२ मार्चपर्यंत लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. यामुळेच कंपनीचा इलेक्ट्रिक व्हेहिकल (EV) प्रकल्प प्रगत अवस्थेत आहे. कंपनी आपले उत्पादन दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर येथील प्लांटमध्ये तयार करणार आहे.