देशात दुचाकी घेण्याकडे तरुणांचा सर्वाधिक कल आहे. दुचाकी खरेदी करताना बाइकचा मायलेज आणि किंमत याकडे लक्ष दिलं जातं. ही बाब लक्षात घेऊन सर्व प्रमुख कंपन्यांनी त्यांच्या कमी बजेटच्या मायलेज बाइक बाजारात आणल्या आहेत. तुम्ही मायलेज देणारी बाइक शोधत असाल तर, इथे तुम्हाला दोन लोकप्रिय बाइक्सची माहिती दिली आहे. या दोन गाड्या केवळ मायलेजच देत नाहीत तर स्टाइल देखील चांगली आहे.Hero HF Deluxe आणि TVS स्पोर्ट बाइक्स असून त्यांची किंमत, तपशील आणि मायलेज तपशीलांबद्दल जाणून घ्या.

Hero HF Deluxe: हिरो एचएफ डिलक्स बाइक ही कंपनीची एक लोकप्रिय बाईक आहे. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात सिंगल सिलेंडर ९७.२ सीसी इंजिन आहे. इंजिन ८.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने तिच्या पुढच्या आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही हिरो एचएफ डिलक्स बाइक ८८.२४ किमीचा मायलेज देते. बाइकची सुरुवातीची किंमत ५२,७०० रुपये असून टॉप मॉडेलवर ६३,४०० रुपयांपर्यंत जाते.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! एकाच चार्जमध्ये करू शकाल दिल्ली ते हरिद्वारचा प्रवास; जाणून घ्या अधिक तपशील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

TVS Sport: टीव्हीएस स्पोर्ट ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मायलेज बाइक आहे. कंपनीने दोन प्रकारांसह लॉन्च केली होती. टीव्हीएस स्पोर्टच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात १०९.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२९ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ४-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, टीव्हीएसनने या बाईकच्या पुढील चाकामध्ये आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत. मायलेजबाबत, टीव्हीएस दावा करते की, ही स्पोर्ट बाइक प्रति लिटर ७० किलोमीटर मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टीव्हीएस स्पोर्टची सुरुवातीची किंमत ५८,१३० रुपये असून टॉप व्हेरियंटवर ६४,६५५ रुपयांपर्यंत जाते.