भारतीय बाजारात दुचाकींची सर्वाधिक मागणी आहे. कमी किंमत आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या दुचाकींची सर्वाधिक विक्री होते. बाजारात १०० सीसी आणि १२५ सीसीपर्यंतच्या दुचाकी बजेटमध्ये मिळतात. जर तुम्ही १२५ सीसी सेगमेंटमधील दुचाकी घेऊ इच्छित असाल तर दोन पर्याय आहे. मजबूत इंजिन, मायलेज आणि स्टाईलसाठी पसंती दिली जात आहे. हिरो सुपर स्प्लेंडर आणि होंडा एसपी १२५ असा दोन दुचाकींची तुलना केल्यानंतर तुम्हाला योग्य पर्याय निवडता येणार आहे.

Hero Super Splendor: हिरो सुपर स्प्लेंडर ही सर्वाधिक विकल्या दुचाकींच्या यादीत आहे. कंपनीने दोन प्रकारात लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर १२४.७ सीसी इंजिन आहे. जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. इंजिन ११ पीएस पॉवर जनरेट करते आणि १०.६ एनएम पीक टॉर्क आणि ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवले आहेत. मायलेजबद्दल हिरो मोटोकॉर्प दावा करते की, ही बाईक ८०.६ किमीचा मायलेज देते आणि मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. हिरो सुपर स्प्लेंडरची सुरुवातीची किंमत ७३,९०० रुपये असून टॉप मॉडेलवर ७७,६०० रुपयांपर्यंत जाते.

December Offer: ह्युंदईच्या ‘या’ गाड्यांवर मोठी सूट; असा घ्या फायदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Honda SP 125: होंडा एसपी कंपनीची एक स्टायलिश बाईक आहे, कंपनीने दोन प्रकारात लॉन्च केली आहे, या बाईकमध्ये होंडाने १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले असून फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १०८ पीएसची कमाल पॉवर आणि १०.९ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह दिलेले आहे, बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक बसवण्यात आला आहे. मायलेजबद्दल होंडाचा दावा आहे की, ही बाईक ६५ किमीपर्यंत मायलेज देते. या बाईकची सुरुवातीची किंमत ७८,९४७ रुपये असून टॉप मॉडेलमध्ये ८३,२४२ रुपयांपर्यंत जाते.