पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यापासून इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ही विक्री आणखी वाढविण्याचे काम भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदानातून केले जात आहे. त्याचवेळी, ही सबसिडी पुढे नेत, काही काळापूर्वी देशातील पहिले राज्य म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक सायकलींच्या खरेदीवर ७५०० रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, आता Hero Cycles Limited चा ई-सायकल ब्रँड Hero Lectro ने दिल्ली सरकारच्या EV धोरणांतर्गत त्याच्या पाच प्रकारांची पात्रता जाहीर केली आहे. सबसिडीनंतर ई-सायकलची किंमत काय असेल आणि कोणत्या मॉडेलला सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया.

‘या’ सायकलींवर मिळणार सवलत

Hero Electro ने ई-सायकलच्या फक्त ५ मॉडेल्सवर सबसिडी देण्याची घोषणा केली असून, या सायकल्सची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. यापैकी, पहिल्या १००० सायकलच्या विक्रीवर ५००० रुपयांच्या अनुदानासह २००० रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जाईल. तसंच, Hero Lectro C6, C8i, F6i आणि C5 व्यतिरिक्त, Hero Lectro Cargo Winn वर १५,००० रुपयांची सबसिडी उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात स्वस्त हिरोच्या बॅटरी सायकलची किंमत २३,४९९ रुपये असेल तर सर्वात महाग सायकलची किंमत ४७ हजार ४९९ रुपये असेल.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?

(हे ही वाचा: जगातली पहिली सोलर इलेक्ट्रिक कार आली! एकाच चार्जवर ७ महिने चालणार)

ई-सायकलवर सबसिडी देणारे दिल्ली हे पहिले राज्य ठरले आहे. जर ही सबसिडी मिळवायची असेल, तर सदर ग्राहक दिल्लीची रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच, ग्राहकाला फक्त एकाच ई-सायकलवर सबसिडी मिळेल. याशिवाय, ही सबसिडी ताशी २५ किमी वेगाने असलेल्या ई-सायकलवर उपलब्ध असेल. याशिवाय, ई-सायकलच्या पहिल्या ५००० खरेदीदारांना १५००० रुपयांची सबसिडी दिली जाईल.