scorecardresearch

Premium

मागच्या १० वर्षात ‘या’ गाड्यांची सर्वाधिक विक्री; किंमत आणि एव्हरेजमुळे मागणी

मागच्या १० वर्षांची आकडेवारी पाहिली तर ग्राहकांनी कमी किंमत आणि एव्हरेज पाहून गाड्या खरेदी केल्याचं दिसत आहे.

maruti-suzuki-alto-759
मागच्या १० वर्षात या गाड्यांची सर्वाधिक विक्री; किंमत आणि एव्हरेजमुळे मागणी (Photo- Indian Express)

भारतीय ग्राहक गाडी खरेदी करताना किंमत आणि एव्हरेजचा विचार करतो. या दोन सूत्रांमध्ये गणित बसलं की, गाडी खरेदी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो. मागच्या १० वर्षांची आकडेवारी पाहिली तर ग्राहकांनी कमी किंमत आणि एव्हरेज पाहून गाड्या खरेदी केल्याचं दिसत आहे. देशात सध्या मारुती सुझुकीच्या गाड्यांचा बोलबाला आहे. या कंपनीच्या गाड्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पाच सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी चार गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. या यादीत मारुती सुझुकी अल्टो पहिल्या क्रमांकावर आहे. गाडीवाडीच्या अहवालानुसार, अल्टो ही १० वर्षात देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. गेल्या वर्षीच अल्टोने ४० लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला होता.

अहवालानुसार, १० वर्षात अल्टोचा बाजारातील हिस्सा १९.६६ टक्के होता. १४.९३ टक्के मार्केट शेअर असलेली मारुती सुझुकी डिझायर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट आणि वॅगन आर अनुक्रमे १४.३१ टक्के आणि १२.२२ टक्के मार्केट शेअरसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. ह्युंदई आय-२० हॅचबॅक पाचव्या क्रमांकावर असून एकूण बाजार हिस्सा १२.२२ टक्के आहे. मारुती सुझुकी अल्टो ही एक परवडणारी हॅचबॅक कार आहे ज्याची किंमत रु. ३.१५ लाख ते रु. ४.८२ लाख आहे. पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त सीएनजीमध्ये देखील येते. पेट्रोलमध्ये २२.०५ किमी प्रति तास आणि सीएनजीमध्येमध्ये ३१.५९ किमी प्रति तास एव्हरेज देते.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

बाउन्स इनफिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर २ डिसेंबरला होणार लॉन्च; ४९९ रुपयांपासून बुकिंग

मारुती अल्टोच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले सपोर्ट आहे. कारला कीलेस एंट्री आणि फ्रंट पॉवर विंडो देखील मिळतात. सुरक्षिततेसाठी, ड्रायव्हर साइड एअरबॅग, मागील पार्किंग सेन्सर उपलब्ध आहेत. याची थेट स्पर्धा रेनॉल्ट क्विड आणि डॅटसन रेडीशी आहे. कंपनी लवकरच आपले नवीन-जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Highest sales of these vehicles in india last 10 years demand due to price and average rmt

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×