आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होऊ लागला आहे. देशात १३७ दिवस पेट्रोलचे स्थिर असलेले दर गगनाला भिडले आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दर स्थिर होते. या काळात कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ३० डॉलरची वाढ झाली होती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे. गेल्या नऊ दिवसात आठव्यांदा दरवाढ झाली आहे. देशभरामध्ये आज इंधनाचे दर प्रति लिटरमागे ८० पैशांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या दरवाढीमुळे आतापर्यंत १०० रुपये लिटरच्या आत असणाऱ्या डिझेलच्या दरांनी मुंबईमध्ये १०० चा टप्पा ओलांडलाय. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांचा खिशाला बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्लोबल पेट्रोल प्राइस डॉट कॉम या वेबसाईटनुसार २८ मार्च २०२२ रोजी भारतात पेट्रोलची किंमत १०२.४२ रुपये प्रति लिटर होती. तर अमेरिकेत ९२.६० रुपये इतकी होती. जापानमध्ये १०३.९३ रुपये, दक्षिण अफ्रिकेत १०९.६८ रुपये आणि चीनमध्ये ११०.२९ रुपये इतका होता.

१ एप्रिलपासून कार खरेदी करणं पडेल महागात, कोणत्या गाड्यांचे भाव वाढणार? जाणून घ्या

या देशात सर्वात स्वस्त पेट्रोल

  • व्हेनेझुएलामध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त आहे. येथे पेट्रोलची किंमत १ रुपये ९० पैसे म्हणजेच ०.०२५अमेरिकन डॉलर प्रति लिटर आहे. ही किंमत भारताच्या तुलनेत ५० पट कमी आहे.
  • लिबियामध्ये पेट्रोलची किंमत २ रुपये ४३ पैसे किंवा ०.३२ डॉलर प्रति लिटर आहे.
  • सीरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २४ रुपये किंवा ०.३१६ डॉलर प्रति लिटर आहे. ते भारताच्या तुलनेत चौपट स्वस्त आहे.
  • तुर्कमेनिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३२ रुपये ५१ पैसे म्हणजेच ०.४२८ डॉलर प्रति लिटर आहे.
  • नायजेरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३० रुपये ३८ पैसे म्हणजेच ०.४०० डॉलर प्रति लिटर आहे.
  • कुवेतमध्ये एक लिटर पेट्रोल २६ रुपये २१ पैसे म्हणजेच ०.३४५ डॉलरला विकत घेतले जाते.
  • कझाकस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३१ रुपये ६ पैसे म्हणजेच ०.४०९ डॉलर आहे.
  • इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ३ रुपये ८७ पैसे म्हणजेच ०.०५१ डॉलर आहे.
  • अल्जेरियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत २४ रुपये ४६ पैसे म्हणजेच ०.३२२ डॉलर आहे.
  • अंगोलामध्ये एक लिटर पेट्रोलचा दर २६ रुपये ६६ पैसे म्हणजेच ०.३५१ डॉलर आहे.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much price of petrol in other countries compared to india find out rmt
First published on: 30-03-2022 at 16:44 IST